Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVilas Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विलास शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी; केली...

Vilas Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विलास शिंदेंवर सोपवली मोठी जबाबदारी; केली ‘या’ पदावर नियुक्ती

नाशिक | Nashik

शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी सात ते आठ माजी नगरसेवकांसह काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे नाशकात उबाठाला मोठे खिंडार पडले होते. त्यानंतर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांची नाशिक जिल्हा (Nashik District) शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल (शुक्रवारी) मुंबईत (Mumbai) विलास शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने विलास शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विलास शिंदे संपर्कप्रमुख म्हणून पुढील आठवड्यात नाशिकमध्ये बैठक घेणार असून, यात पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी रणनीती आखली जाणार आहे.

YouTube video player

शिवसेना (उबाठा) पक्ष सोडण्यापूर्वी विलास शिंदे यांनी अनेकदा पक्षनिष्ठा व्यक्त केली होती. तसेच पक्षात निर्णय प्रक्रियेबाबत काही अपेक्षा पूर्ण न झाल्याने नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यांनी ती वरिष्ठांकडे स्पष्टपणे मांडलीही होती. शिंदे यांना जिल्हाप्रमुख (District Chief) बदलाच्या प्रक्रियेत ज्येष्ठत्वामुळे हे पद मिळावे, अशी अपेक्षा होती. पंरतु, ती पूर्ण झाली नाही, तरी पक्ष मेळावा यशस्वी करण्यासाठी पूर्ण योगदान दिले.तसेच मुलीच्या लग्नामुळे काही काळ कार्यापासून दूर राहिलो, ते नाराजीचे कारण नव्हते”, असेही विलास शिंदे म्हणाले होते.

दरम्यान, विलास शिंदे यांच्यासह सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच आता विलास शिंदे यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाने संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे अधिक शिंदेसेनेला अधिक बळ मिळाले आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...