Tuesday, April 28, 2026
HomeनाशिकNashik Politics : जिल्ह्यातील 'या' नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे जाणार; नेमकं कारण...

Nashik Politics : जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे जाणार; नेमकं कारण काय?

नाशिक | Nashik

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल न्यायालयात (Court) अपील असलेल्या आणि प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना वेळ मर्यादा न पाळल्याने राज्यातील काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, अमरावती, नांदेड,धाराशिव, यवतमाळ, जालना, सोलापूर या जिल्ह्यातील नगरपरिषदांचा समावेश आहे. नव्याने निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी घोषित करणार असून, २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) चांदवड आणि ओझर या नगरपरिषदांची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, देवळाली आणि पाथर्डी या नगरपरिषदांचा समावेश आहे. चांदवड आणि ओझर नगरपरिषदांचा संपूर्ण कार्यक्रम पुढे जाणार की काही प्रभागांमधीलच निवडणुका (Election) पुढे जाणार याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलेले नसल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांना देखील जिल्ह्यातील पुढे जाणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकांबाबत विचारणा केली जात आहे. मात्र, त्यांच्याकडून आम्ही याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत आहोत, असे सांगण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन नगरपरिषदांसह जिल्ह्यातील इतरही नगरपरिषदांबाबत काय निर्णय होतो? याकडेही लक्ष लागले आहे..

सुधारित निवडणूक कार्यक्रम

४ डिसेंबर : जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.

१० डिसेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) : नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.

११ डिसेंबर : चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.

२० डिसेंबर : मतदान.

२१ डिसेंबर २०२५ : मतमोजणी.

२३ डिसेंबरपूर्वी : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

ताज्या बातम्या

Kopargaon : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी खोर्‍यात 78 टीएमसी पाणी येणार

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसमृद्धी योजनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामावर भर दिला आहे. तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी...