Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Municipal Corporation Election : नात्यागोत्यांचा भरला मेळा! मनपाची निवडणूक ठरतेय 'कौटुंबिक...

Nashik Municipal Corporation Election : नात्यागोत्यांचा भरला मेळा! मनपाची निवडणूक ठरतेय ‘कौटुंबिक रणांगण’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेच्या प्रचार निवडणुकीचा (Nashik Municipal Election) दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून, यंदाची निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय लढत ही पक्षांपुरती मर्यादित न राहता थेट नात्यागोत्यांमध्येच अडकली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे जणू ‘नात्यागोत्यांचा भरलेला मेळा’च ठरत आहे. भाऊ-भाऊ, पती-पत्नी, काका-पुतणे, दीर-भावजय, नणंद-भावजय, सासरे-सून, मामा-भाचे एवढेच नव्हे तर मेहुण्याची पत्नीही निवडणूक रिंगणात उतरविल्याने नाशिक मनपाचा निवडणूक राजकीय आखाडा अधिकच रंगला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी ही नाती थेट समोरासमोर शड्डू ठोकत एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत आहेत.

- Advertisement -

राजकारण आणि घराणेशाही यांचा अतूट संबंध आता नवीन राहिलेला नाही. एकीकडे राजकीय पक्ष (Political Party) घराणेशाहीवर टीका करत असतानाच, दुसरीकडे स्वतःच्याच पक्षांमध्ये नात्यांना उमेदवारी देत घराणेशाहीला खतपाणी घातले जात असल्याचे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतून ठळकपणे समोर येत आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये नात्यांमधील लढती पाहायला मिळाल्या असल्या तरी, यंदा मात्र एक डझनहून अधिक नातेसंबंधातील उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भावाभावांमधील थेट लढत हे यंदाच्या निवडणुकीचे मोठे वैशिष्ट्य ठरत आहे.

हे देखील वाचा : Nashik Politics : नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल – खासदार श्रीकांत शिंदे

निवडणुका म्हटलं की, राजकारण हे राजकीय लोकांच्या कुटुंबाभोवतीच (Family) फिरते ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक निवडणुकांमध्ये नात्यागोत्यातच निवडणुका आणि राजकारणाचा आलेख अलीकडच्या काळात वाढू लागला आहे. मागे वळून पाहताना ज्या ज्या सर्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत. त्या ठिकाणी नात्यांमधली निवडणूक ही बोटावर मोजण्या इतकीच झाल्याचे उदाहरण आहे. यामध्ये भाऊ-भाऊ, काका-पुतणे, सासू-सासरे असे एकत्रित लढल्याचे वा समोरासमोर लढण्याचे उदाहरणे फार क्वचित आहेत.

दरम्यान, या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी महापौर दशरथ पाटील (Dashrath Patil) यांचे चिरंजीव प्रेम हे शिवसेनेकडून (Shivsena) तर दशरथ पाटील यांचे बंधू माजी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल हे भाजपकडून (BJP) रिंगणात उतरले असून प्रेम आणि अमोल यांनी थेट एकमेकांनाच आव्हान दिले आहे.

निवडणुकीत उतरलेले नातेसंबंधातील उमेदवार

माजी नगरसेवक शाहू खैरे – माजी नगरसेविका वत्सला खैरे (दिर भावजयी)
प्रेम पाटील-अमोल पाटील (भाऊ-भाऊ)
माजी नगरसेवक दिलीप दातीर-दीपक दातीर (काका-पुतणे)
माजी नगरसेवक सलीम (मामा) शेख – फरीदा शेख (पती-पत्नी)
माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर – दीपक बडगुजर (पिता-पुत्र)
आदिती ऋतुराज पांडे-शिवानी चंद्रकांत पांडे (नणंद भावजयी)
माजी नगरसेवक राहुल दिवे-माजी नगरसेवक प्रशांत दिवे (भाऊ-भाऊ)
माजी नगरसेवक शाहू खैरे-माजी नगरसेवक संजय चव्हाण (मामा-भाचे)
माजी नगरसेविका कल्पना चुंभळे-कैलास चुंभळे (काकू पुतण्या)
टिंकू उर्फ नितीन खोले-ज्योती खोले (दीर-भावजयी)
माजी नगरसेवक डी.जी.सूर्यवंशी-माधवी सूर्यवंशी (पती-पत्नी)
माजी नगरसेवक प्रकाश लोंढे-माजी नगरसेविका दीक्षा लोंढे (सासरे- सून)
राजेंद्र महाले-पूनम महाले (दीर-भावजयी)
माजी नगरसेवक प्रवीण तिदमे-अक्षदा पांगरे (मेव्हण्याची पत्नी).

ताज्या बातम्या

Shrirampur : रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तालुक्यातील खंडाळा (Khandala) शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे (Railway) मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह (Youth and Young Girl Dead Body) रेल्वेखाली चिरडलेल्या...