Monday, September 7, 2026
HomeनाशिकNashik Politics : भगूरला नगराध्यक्षपदासाठी पाच अर्ज; करंजकर, बलकवडे, देशमुख मैदानात

Nashik Politics : भगूरला नगराध्यक्षपदासाठी पाच अर्ज; करंजकर, बलकवडे, देशमुख मैदानात

दहा प्रभागांसाठी १५३ अर्ज दाखल

भगूर | वार्ताहर | Bhagur

भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी (Bhagur Nagar Parishad) पाच तर एकूण दहा प्रभागांसाठी १५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना शिंदे गटातर्फे अनिता करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप आघाडीतर्फे प्रेरणा बलकवडे तर शिवसेना उबाठा पक्ष-मनसे युतीच्या वतीने जयश्री देशमुख, अपक्ष पूजा बागडे, मीना आडके यांनी अर्ज दाखल केले.भगूर नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अनिता विजय करंजकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

- Advertisement -

याप्रसंगी शिवसेना (Shivsena) उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, प्रवीण बंटी तिदमे, मामा ठाकरे, विक्रम सोनवणे, अंबादास कस्तुरे, मंगेश बुरके, संजय शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, प्रवीण पाळदे, राजू मुंदडा, बाळासाहेब घोरपडे, अनिल गायकवाड आदी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर, दीपक बलकवडे, गोरखनाथ बलकवडे, विद्या बलकवडे, विशाल बलकवडे, अनाजी कापसे, नीलेश हासे, प्रमोद शेटे, पगार, संदीप शेटे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उबाठा पक्ष व मनसे युतीच्या वतीने माजी नगरसेविका जयश्री काकासाहेब देशमुख यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी (Candidate) अर्ज दाखल केला. याप्रसंगी शिवसेना उबाठा पक्षाचे शहरप्रमुख काकासाहेब देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण, सुभाष जाधव, दिनेश आर्य, नितीन काळे, श्याम देशमुख, गजानन आंधळे, अभिषेक चव्हाण, अजय देशमुख, कुणाल जगताप, राकेश चव्हाण, आदींसह उबाठा गटाचे पदाधिकारी व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पूजा चेतन बागडे यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.याप्रसंगी माजी नगरसेवक चेतन बागडे, नंदू गायकवाड, विलास जाधव जाधव, संदीप बागडे, सागर वाकचौरे, प्रवीण नाईकवाडे, निखिल कातकाडे, भानुदास देशमुख आदी नागरिक उपस्थित होते. अपक्ष म्हणून मीना अंबादास आडके यांनीही थेट नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात व शक्तिप्रदर्शन करून नगरपरिषदेच्या कार्यालयात दाखल होत होते. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर यांचा उमेदवारी अर्ज भगूर शहरातून भव्य रॅली काढून दाखल करण्यात आला, तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आघाडीच्या वतीने प्रेरणा बलकवडे यांचा उमेदवारी अर्ज शहरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने भव्य रॅली काढून दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सत्तर वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांसमोर आरोपी...

0
वणी | वार्ताहर | Vani दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...