Thursday, April 23, 2026
HomeनाशिकNashik Politics : भाजपला मोठा धक्का; माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा पक्षाला...

Nashik Politics : भाजपला मोठा धक्का; माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा पक्षाला रामराम

ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील प्रभाग क्रमांक २० च्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangita Gaikwad) व त्यांचे पती बांधकाम व्यवसायिक हेमंत गायकवाड तसेच रोहन देशपांडे यांनी भाजपच्या (BJP) सदस्यत्वचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोमवार (दि. २० रोजी) हे सर्वजण ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर हा सोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

संगीता गायकवाड, हेमंत गायकवाड आणि रोहन देशपांडे हे तिघे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने नाशिकरोडच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. संगीता गायकवाड या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. अगोदर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या, तर त्यांचे पती सुद्धा या अगोदर शिवसेनेत (Shivsena) होते. आता ते पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत.

तर रोहन देशपांडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता एक वर्षानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने हेमंत गायकवाड व त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : आकारी पडीत जमीन मोजणी नंतर उर्वरित जमिनीवर उद्योग

0
माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgaon शेती महामंडळाच्या हरिगाव मळ्यातील आकारी पडीत जमिनी मुळ वारसांना सिलिंग अँक्ट प्रमाणे मोजणी करून उर्वरित जमिनी उद्योगास देणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर...