Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; 'या' माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत...

Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार; ‘या’ माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena UBT) मोठे भगदाड पडताना दिसत आहे. दोन आठवड्यापूर्वी माजी आमदार निर्मला गावित, नरेंद्र दराडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह १५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच आज (मंगळवार) ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकूण चार माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) प्रवेश केला आहे. यामध्ये किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामणे यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. या माजी नगरसेवकांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत (NMC Election) चारही जागा निवडून आणण्याचा दावा केला.

दरम्यान, आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेतील २० माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच पुढील आठवड्यात आणखी काही नगरसेवक (Corporators) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही. दुसरीकडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सत्ताधारी गटात जात असल्याने त्यांना थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर उभे ठाकले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी पद्धत बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शासनाच्या आदेशानुसार भूमापन हद्दीतील बिनशेती वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी पद्धत बंद करण्यात आली आहे. नगर शहर भूमापन हद्दीत असल्याचे कारण देत...