Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : नाशकात ठाकरे गटाला खिंडार; विलास शिंदे आज करणार...

Nashik Politics : नाशकात ठाकरे गटाला खिंडार; विलास शिंदे आज करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पक्षप्रवेशासाठी विलास शिंदे नाशिकहून ठाण्याकडे रवाना

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) सहा ते सात नगरसेवकांसह २० सरपंच व हजारो कार्यकर्त्यांचा ठाणे (Thane) येथे आज रविवारी (दि. २९) सकाळी शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

मागील ३० वर्षांपासून शिव सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर काम केले. कोणतीही राजकीय लालसा न बाळगता कार्यकर्ता म्हणून आपण काम केले. मध्यंतरी खासदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीतही (Vidhansabha Election) जोमाने काम करून पक्षाचे वर्चस्व कायम राखले होते.शिवसेनेतून आऊट गोइंग सुरू असताना खंबीरपणे कार्यकत्यांची फळी लावून धरत, सातपूरसह संपूर्ण शहरातील संघटना एकजूट ठेवली होती.

YouTube video player

या पार्श्वभूमीवर पक्षातून (Party) बाहेर जाणार, अशा बोंबा लोक मारत होते. कोणत्याही कामाचे मूल्यमापन न करता केवळ कानगोष्टी ऐकून पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हा आपणास पसंत पडला नाही. आपली सेवाज्येष्ठता, आपला अनुभव, आपल्या कामाची पद्धत प्रभागातून आणि चार नगरसेवकांची एकमुखी साथ या सर्व गोष्टींचा विचार पक्षाने केला नाही. तडकाफडकी पदावरून बरखास्त केले. त्यामुळे आपण नाराज झालो असल्याचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी सांगितले.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटामध्ये आज (रविवारी) हजारो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ठाणे येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. आपल्यासोबत माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, धीरज शेळके, निवृत्ती इंगोले अशा १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह परिसरातील २० ग्रामपंचायतींचे सरपंच व कार्यकर्ते आज शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

पक्षप्रवेशासाठी विलास शिंदे नाशिकहून ठाण्याकडे रवाना

विलास शिंदे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी नाशिकहून ठाण्याकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्ते आहेत. तर गाड्यांवर एकनाथ शिंदेंच्या फोटोसह पक्षप्रवेशाचे मोठे फलक लावलेले आहेत. तसेच आजचा पक्षप्रवेश हा फक्त ट्रेलर असून, पिक्चर अजून बाकी आहे. येत्या काळात नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा निर्धार विलास शिंदे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

Baramati Politics : बारामतीत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये...

0
बारामती । Baramati राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या...