Thursday, February 5, 2026
HomeराजकीयNashik Politics : ठाकरे गटाला पुन्हा धक्का; माजी आमदार निर्मला गावितांचा कार्यकर्त्यांसह...

Nashik Politics : ठाकरे गटाला पुन्हा धक्का; माजी आमदार निर्मला गावितांचा कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर (Vidhansabha Election) राजकीय समीकरणांमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर शिंदे गटाने हल्लाबोल सुरू केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाला सलग दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. आज (बुधवार) इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. याआधी माजी आमदार नरेंद्र दराडे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

- Advertisement -

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की,”लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार आहोत” असे त्यांनी म्हटले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Election) महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकमधील (Nashik) पदाधिकार्‍यांना केले. तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांच्या मानधनवाढीच्या विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू, ” असेही त्यांनी आश्वस्त केले.

YouTube video player

दरम्यान, याप्रसंगी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे राज्य प्रमुख आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, मा. खासदार हेमंत गोडसे, मा. आमदार पांडुरंग गांगड, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख संपत काळे, तालुका प्रमुख रवी भोये, रघुनाथ तोकडे, सुरेश गंगापुत्र, सनी मेढे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, त्यांनीही शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.

या नेत्यांनी केला प्रवेश

१) रमेश वेलजी गावित – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन.

२) नयना रमेश गावीत माजी उपाध्यक्षा जिल्हा परिषद नाशिक शिवसेना (उबाठा).

३) कचरू डुकरे- माजी सभापती बाजार समिती घोटी, माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस इगतपुरी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा अध्यक्ष शिवसेना (उबाठा).

४) सोमनाथ जोशी- माजी सभापती पंचायत समिती इगतपुरी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा उपाध्यक्ष शिवसेना (उबाठा).

५) संदिप शिवराम जाधव- मा. उपजिल्हाप्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक, मा. सरपंच शेणित, संचालक – विविध कार्य.सोसायटी शेणीत, युवासेना – शिवसेना (उबाठा)

६) मोतीराम दिवे माजी सभापती पंचायत समिती त्रंबकेश्वर.

७) गणपत वाघ- माजी सभापती पंचायत समिती त्रंबकेश्वर.

८) मथुराताई जाधव- ग्रामपंचायत सदस्या घोटी ग्रामपालिका, तालुका संघटक महिला बचत गट इगतपुरी, शिवसेना (उबाठा).

९) साहेबराव धोंगडे- माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी बेलगांव.

१०) शरद कुटके- माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी वांजोळे, शिवसेना (उबाठा).

११) गुलाबराव वाजे सदस्य ग्रामपंचायत म्हसुर्ली, शिवसेना (उबाठा).

१२) रमेश शिंदे- माजी सरपंच उभाडे,

१३) गणेश खंडेराव जाधव-मा. सरपंच शेणित, संचालक-विविध कार्य. सोसायटी शेणित,

१४) दत्ता निवृत्ती जाधव- मा.सदस्य ग्रामपंचायत शेणित.

१५) विलास मालुंजकर- माजी अध्यक्ष युवक काँग्रेस इगतपुरी तालुका.

१६) अंबादास माडी- माजी सरपंच ठाणापाडा.

१७) मधुकर पंडित झोले- माजी सरपंच टाके देवगांव.

१८) नाना वारे- माजी सरपंच टाके देवगांव.

१९) पांडुरंग आचारी- माजी सरपंच पेगलवाडी त्रंबक, शिवसेना (उबाठा).

२०) रमेश शेंडे- सदस्य ग्रामपंचायत हरसुल,

२१) रमेश भोये- सदस्य ग्रामपंचायत हरसुल, शिवसेना (उबाठा).

२२) दिलीप घोरपडे सदस्य ग्रामपंचायत डहाळेवाडी.

२३) तुकाराम चौधरी संघटक शिवसेना (उबाठा) बेरवळ.

 

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीत भाविकांचे दागिने ओरबाडणारा श्रीरामपूरचा सराईत गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेवर डल्ला मारणार्‍या एका अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. तामिळनाडूमध्ये...