Sunday, July 26, 2026
HomeराजकीयNashik Politics : बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री बावनकुळेंचे सूचक विधान; म्हणाले, "पक्ष...

Nashik Politics : बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री बावनकुळेंचे सूचक विधान; म्हणाले, “पक्ष वाढीसाठी…”

नाशिक | Nashik

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख आणि उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakr Badgujar) यांना उद्धव ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून बडतर्फ केले आहे. बडगुजर हे संजय राऊतांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई केल्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शविला आहे. यानंतर आता बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Election) पक्षाला चांगले यश मिळवायचे आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले आहे”, असे म्हटले आहे. यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. बडगुजर भाजपमध्ये आले तर महापालिका निवडणुकीत पक्षाची सिडको भागात चांगली ताकद वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय बडगुजर यांच्या रूपाने भाजपला शहरात आणखी एक ओबीसी (OBC) चेहरा मिळू शकतो. यामुळे आता सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार की दुसर्‍या पक्षात जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गिरीश महाजनांचा महापालिका निवडणुकीसाठी १०० प्लसचा नारा

आज नाशिकमध्ये भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी १०० प्लसचा नारा दिला आहे. तसेच महापालिका निवडणुकांसाठी युती झाली तर ठीक, नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे विधानही महाजन यांनी केले. याशिवाय गटबाजी थांबून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा अशा सूचनाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळी करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : डिलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची साडेसात लाखांची फसवणूक

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik अंबडगाव (एमआयडीसी) परिसरातील (Ambad gaon MIDC) एका हार्डवेअर दुकानदाराची 'एशियन पेंट्स' कंपनीची डिलरशिप मिळवण्याच्या नादात तब्बल ७ लाख ४९ हजार...