Wednesday, August 19, 2026
HomeनाशिकChhagan Bhujbal : मंत्री भुजबळांना देखील AAIB च्या अहवालावर शंका; म्हणाले,...

Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांना देखील AAIB च्या अहवालावर शंका; म्हणाले, “शेकडो लोक असताना कुणीही अजितदादांचे विमान…”

नाशिक | Nashik

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे २८ जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. तसेच अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा घातपात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारीला एएआयबीचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालात लँडिंगच्या वेळी विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले, असे नमूद असल्याचे बोलले जाते. त्यानंतर आता या अहवालावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शंका व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, बारामतीच्या विमानतळावर (Baramati Airport) शेकडो लोक आणि माध्यम प्रतिनिधी असताना कुणीही अजितदादांचे विमान झाडावर आदळल्याचे सांगितले नाही. विमानाने पहिल्यांदा लँडिंग रद्द करून दुसर्‍या प्रयत्नात खाली येत असताना ते कलले. त्यामुळे कदाचित कंट्रोल करायला वेळ मिळाला नसेल.जर विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झाले असते, असे म्हणत त्यांनी एएआयबीच्या अहवालावर शंका उपस्थित केली.

डीजीसीएकडे चौकशीची मागणी

मंत्री भुजबळ यांनी हा विमान अपघात (Accident) आहे की तांत्रिक बिघाड याचा शोध घेण्यासाठी डीजीसीए (DGCA) मार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच विमानाचे लँडिंग का फसले आणि विमानाची स्थिती नेमकी कशी होती हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर काय म्हणाले?

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी दोन दिवसांपूर्वी व्हीएसआर विमानाचा मालक रोहित सिंह यांचा विमानात चालकाच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “जय पवार यांनी पायलटचा झोपलेल्या अवस्थेत शेअर केलेला व्हिडिओ अजित पवार यांच्या विमानाचा नसून तो दुसऱ्या विमानाचा आहे. पायलटच्या सीटवर पायलट झोपणे चुकीचे असून, निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे. अजित पवारांच्या विमानात मालक असता तर तो ठार झाला असता”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने...