Wednesday, October 21, 2026
HomeनाशिकChhagan Bhujbal : बेकायदेशीरपणे वृक्ष तोडणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका, खड्डे बुजवा,...

Chhagan Bhujbal : बेकायदेशीरपणे वृक्ष तोडणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका, खड्डे बुजवा, अन्यथा…; मंत्री भुजबळ नाशिकमधील प्रश्नांवर सडेतोड बोलले

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज (रविवारी) नाशिकमध्ये (Nashik) माध्यमांशी संवाद साधला असता दिशा सालियान प्रकरण, सिंहस्थ कुंभमेळा कामे, त्र्यंबकेश्वर येथे पर्यटकांवर झालेला हल्ला आणि नाशिकमध्ये झालेली बेकायदेशीर वृक्षतोडीवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी दिशा सालियान प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, चौकशी करणाऱ्या तपास संस्था यातील सत्य नक्कीच बाहेर आणतील, असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

कुंभमेळा तयारी आणि जमीन अधिग्रहण

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) नियोजनाबाबत बोलताना ते म्हणाले की, “कुंभमेळ्याच्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नाही, तरी अधिकारी मला त्याची माहिती देतील. ठरल्याप्रमाणे सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कुंभमेळ्यासाठी ३८ हजार कोटी खर्च केले जात असताना, मागचे थकीत पैसे देणे गरजेचे आहे. जमीन अधिग्रहित करताना कोणावरही अन्याय होता कामा नये आणि ही तयारी नाशिककरांच्या जिवावर उठणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

खड्डे बुजवा, अन्यथा पर्यटनावर परिणाम

पुढे बोलताना भुजबळ यांनी शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले “रामकुंड, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सुटला पाहिजे. खड्ड्यांमुळे शहराचे नाव खराब होत असून पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व विकासकामे वेळेत आणि उत्तम दर्जाची व्हावीत,” अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.

गंगापूर रोडवरील ५० झाडे तोडणारी कंपनी ब्लॅकलिस्ट

गंगापूर रोड परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग्स) स्पष्ट दिसण्यासाठी ५० झाडे बेकायदेशीरपणे कापल्याच्या घटनेवरही भुजबळांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “याप्रकरणी मी महानगरपालिका आयुक्तांशी बोललो असून, संबंधित जाहिरात कंपनीला थेट ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत टाकण्याचे) आदेश दिले आहेत. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून आता नागरिकांनीही अशा प्रकारांविरोधात जागरूक राहिले पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.

पर्यटकांवरील हल्ला खपवून घेणार नाही; पोलिसांना खडेबोल

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर भुजबळांनी तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला. “पर्यटकांच्या गाडीचा स्थानिकांच्या मोटारसायकलला किरकोळ धक्का लागल्यावरून हा वाद वाढला. पर्यटन हा आपल्या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. अशा घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. केवळ पोलीस ठाण्यात बसून न राहता पोलिसांनी सक्रिय राहून सातत्याने गस्त (पेट्रोलिंग) घातली पाहिजे,” असे सांगत त्यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक स्वामी यांच्याशी थेट चर्चा केल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

पाणीटंचाईचे कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा – पाणी पुरवठा मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai कोकण, नागपूर आणि अमरावती विभागांतील संभाव्य पाणीटंचाईच्या सर्व टप्प्यांचे वस्तुनिष्ठ तसेच गावनिहाय कृती आराखडे येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. याशिवाय जलजीवन...