Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMLA Suhas Kande : एकनाथ शिंदेंनी वाढवले आमदार कांदेंचे 'बळ'; 'या' पदावर...

MLA Suhas Kande : एकनाथ शिंदेंनी वाढवले आमदार कांदेंचे ‘बळ’; ‘या’ पदावर केली नियुक्ती

नाशिक | Nashik

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रमख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना नवीन जबाबदारी देऊन त्यांचे बळ वाढवले आहे. शिंदे यांनी कांदेंची ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख नाशिक जिल्हा’ या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पदावर नियुक्ती केली आहे. एक वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई (Mumbai) येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार सुहास कांदे यांची अधिकृतपणे ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, आणि राम रेपाळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या संघटन रचनेत प्रथमच ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख’ हे पद निर्माण करण्यात आले आहे.

दरम्यान, हे पद सर्व जिल्हाप्रमुखांच्या (District Head) वरच्या स्तरावरचे मानले जात आहे. तसेच हे पद निर्माण करण्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक बळकट करणे, रणनीती आखणे व कार्यपद्धती एकसंध करणे, असे असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : ट्रॅफिक पार्कचा अपमृत्यू

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकमध्ये आणखी एका चांगल्या उपक्रमाचा अपमृत्यू होऊ घातला आहे. निओ मेट्रो व आयटी पार्क या महायुतीच्याच...