Tuesday, April 7, 2026
Homeमुख्य बातम्याMP Rajabhau Waje : खासदार वाजेंना बसणार धक्का; काका भाजपच्या वाटेवर?

MP Rajabhau Waje : खासदार वाजेंना बसणार धक्का; काका भाजपच्या वाटेवर?

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांचे काका, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे हे येत्या दोन दिवसांत मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत (BJP) प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गेल्या दोन दिवसात खा. वाजे यांनी घेतलेल्या इच्छुकांच्या दोन्ही बैठकांकडे हेमंत वाजे यांनी पाठ फिरवल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

- Advertisement -

हेमंत वाजे (Hemant Waje) हे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. तशी चाचपणी त्यांनी काही दिवसांपासून सुरूही केली होती. मात्र, सर्वच उमेदवार पक्षाच्या सर्वेनंतर ठरणार असल्याचे सांगितले जात असल्याने फोनाफानीसह अन्य मार्गे त्यांचा प्रचार सुरु होता. प्रवेशासाठी भाजपने त्यांना पायघड्या टाकल्या होत्या. मात्र, राजाभाऊंकडून नकार येत नाही तोपर्यंत कुठलीही घाई त्यांच्याकडूनही होत नव्हती. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांनी राजाभाऊंची भेट घेतल्याची चर्चा असून सर्व्हेत त्यांचे नाव दोन नंबरला असल्याने उमेद‌वारी मिळण्याची शक्यता धुसर असल्याचे संकेत त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. या चर्चेनंतर भाजपकडून त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

हेमंत यांची कन्या कोल्हापूर (Kolhapur) येथे दिली असून तेथून सारी चक्रे फिरल्याची चर्चा आहे. कोल्हापूरहून कोपरगाव, तेथून थेट नाशिकला खलबते सुरु झाली. शनिवारी (दि.८) राजाभाऊंच्या कार्यालयात होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतरही ते बैठकीकडे फिरकले नाहीत. अगदी भाजपच्या इच्छुकांच्या मेळाव्यात उदय सांगळे यांच्यासह त्यांचे सर्व पदाधिकारी गुंतलेले असताना मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या नाशिकच्या निवासस्थानी हेमंत वाजे यांच्यासह भाजपच्या जिल्ह्याच्या नेत्यांची बैठक सुरु होती. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत फोनवरच चर्चा करून हेमंत वाजे यांच्या सर्व अटी-शर्ती स्वीकारण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. येत्या एक दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने वाजे यांना मुबंईत बोलवण्यात येणार असून तेथेच त्यांचा पक्षप्रवेश व नगराध्यक्षाचा एबी फॉर्मही देण्यात येणार असल्याचे समजते.

नगराध्यक्ष पदासाठी वाजे यांच्यासारखा तगडा उमेदवार (Candidate) मिळत असेल तर ओबीसी उमेदवार कशाला असा विचार करून नामदेव लडियांना तुर्त थांबण्याचा निरोप देण्यात आल्याचे समजते. राजाभाऊंकडून हेमंत वाजे यांना काका म्हणून नेहमीच सन्मानाची वागणूकदेण्यात आली. नगरपरिषदेत निवडून आल्यानंतर शिवसेनेचे गेले ते पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले. जुन्य नव्या नगरसेवकांची मोट बांधून ठेवण्यात ते कमी पडल्यानंतर बाळू उगलेसह चार-पाच नगरसेवक फुटून कोकाटे गटाला मिळाले. तरी याबाबत राजाभाऊंनी आपल्या काकांना एका चकार शब्दानेही दुखावले नसल्याची चर्चा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत चुलत्यांना नीलिमाताईंनी आपल्या पॅनलची उमेदवारी दिल्यानंतर विरोधी पॅनलचे नेतृत्व करणारे अॅड. नितिन ठाकरे जवळचे नातेवाईक असतानाही राजाभाऊंनी नीलिमाताईच्या व्यासपीठावरही हजेरी लावली.

आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवातीपासून साथ देणारे कृष्णाजी भगत, अॅड ठाकरे यांच्या पॅनलकडून उभे असतानाही त्यांनी काकांनाच प्राधान्य दिले व आपल्या हक्काची सर्व मते काकांच्याच मागे उभी केली. नगरपरिषदेत गोविंद लोखंडेसह काही नगरसेवकांनी हेमंत वाजे यांच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर सर्वांना शांत करीत काकांच्या सन्मानाला कुठेही ठेच पोहचणार नाही याची काळजी राजाभाऊंनी घेतल्याची चर्चा आहे. कुठलेही राजकीय निर्णय घेताना काकांशी आधी चर्चा केली. त्यांच्या विचारानेच राजकीय वाटचाल केली. असे असताना हेमंत वाजे हे भाजपवासी होणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ना. कोकाटे बुधवारी येणार ?

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरात दिवसभर इच्छुकांची गर्दी बघायला मिळत आहे. सायंकाळी ५ वाजता शिवसेनेच्या इच्छुकांची बैठक राजाभाऊंच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्व इच्छुकाशी त्यांनी चर्चा केली. दुसरीकडे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे कालही सिन्नरला आले नाहीत. पक्षाने त्यांच्यावर धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी सोपवली असून, काल (दि.९) ते धुळ्यात, आज (दि.१०) भुसावळ, जळगावला त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठका होत्या. रात्री तेमुंबईला जातील. माळवारी (दि.११) ते मुंबईतच असणार आहेत. त्यानंतर १२ तारखेला ते सिन्नरला येण्थाची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून सर्व प्रभागांमध्ये ८ नोव्हेंबसासून सर्वे सुरु असून मंगळवारी (दि.१२) हा सर्वे पूर्ण होईल. हा सर्वे पाहिल्यानतरख ना. कोकाटे उमेदवारी निश्चित करण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाकडून सर्वच इच्छुकांना आपापल्या प्रभागात फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने सर्वच इच्छुक मतदारांच्या घरोघर जाऊन भरी-गाठी घेत आहेत.

समता परिषद आघाडीसोबत

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक काल (दि.९) दुमारी ४ च्या दम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, कम्युनिस्टपक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समता परिषदेचे पदा‌धिकारी उपस्थित होते. ही निवडणूक राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी म्हणूनच लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आघाडीतील सर्व पक्षांनी निवडून येणारा योग्य उमेदवार सुचवल्यास त्याबाबत विचार करण्याचा शब्द राजाभाऊंनी या बैठकीत दिल्याचे समजते. सर्व पक्षांनी इच्छुकांतर्फे फॉर्म भरून घ्यावेत. दोन दिवसांनी पुन्हा आघाडीची बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, सर्व पक्षांची मिळून समन्वय समितीही यावेळी तयार करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, माजी अध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, शिवसेनेचे गोविंद लोखंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्तालाई, राजाराम मुरखुद्दे, बॅ. व्ही. एम. अत्रे, डॉ प्रतिभा गारे, जयराम शिंदे, मंगला गोसावी, समता परिषदेचे राजेंद्र जगझाप, शहराध्यक्ष विशाल चव्हाण, डॉ. संदीप लोंढे, कम्युनिस्ट पक्षाचे हरिभाऊ तांबे, मनसेचे एकनाथ दिघे यांच्यासह शिवसेनेसह सर्वच पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

चांडकांची ‘एन्ट्री’ ?

चांडक परिवारातील विवेक चांडकही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले असल्याची पोस्ट व्हॉट्सअॅपवर फिरू लागली आहे. सिन्नर सारख्या विकासासाठी पुन्हा चांडक परिवार पुढे अशी ती लाईन असलेल्या पोस्टमध्ये विवेक यांना विजयी करणे सिन्नर सारख्या शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्व. रामनाथकाका चांडक यांनी पहिले थेट जनतेतील नगराध्यक्ष म्हणून विकासाची बीजे रोखली. त्यांच्यानंतर स्व. जगुभाऊ चांडक यांनी सिन्नरला नवे रुप दिले. चांडक परिवाराने समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम केले. आता विवेक यांच्यासारखा अथवा राज कारणापासून दूर असलेल्या माणसाला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेमकी पोस्ट कुणी टाकली याबाबत ही उलट-सुलट चर्चा होत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...