Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : "कोण विलास शिंदे, मी त्यांना..."; पक्ष प्रवेशाआधीच खासदार संजय...

Nashik Politics : “कोण विलास शिंदे, मी त्यांना…”; पक्ष प्रवेशाआधीच खासदार संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) हे सहा ते सात माजी नगरसेवकांसह २० सरपंच व हजारो कार्यकर्त्यांसोबत एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत आज (रविवारी) पक्षप्रवेश करणार आहेत. ठाण्यात (Thane) हा प्रवेश सोहळा होणार असून, या पक्षप्रवेशासाठी विलास शिंदे हजारो गाड्यांच्या ताफ्यासह नाशिकहून (Nashik) रवाना झाले आहेत.

- Advertisement -

विलास शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पक्षावर नाराजी व्यक्त करत होते. त्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा नाशिकच्या राजकीय (Nashik Politics) वर्तुळात सुरु होत्या. मध्यंतरी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. त्यावेळी राऊत यांनी विलास शिंदे यांना दोन आठवड्यात यावर बैठक घेऊ, असे सांगितले होते. मात्र, पंधरा दिवस उलटून देखील बैठक झाली नाही.

यानंतर अखेर शिंदे यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज विलास शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) प्रवेश करणार आहेत. मात्र, विलास शिंदे यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज नेहमीप्रमाणे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विलास शिंदे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यावर प्रश्न विचारण्यात आला. माध्यम प्रतिनिधींनी राऊत यांना नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी विलास शिंदे पक्ष सोडत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “कोण विलास शिंदे, मी त्यांना ओळखत नाही”, असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.

विलास शिंदे पक्ष प्रवेशासाठी नाशिकहून ठाण्याकडे रवाना

विलास शिंदे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी नाशिकहून ठाण्याकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्ते आहेत. तर गाड्यांवर एकनाथ शिंदेंच्या फोटोसह पक्षप्रवेशाचे मोठे पोस्टर लावलेले आहेत. तसेच आजचा पक्षप्रवेश हा फक्त ट्रेलर असून, पिक्चर अजून बाकी आहे. येत्या काळात नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा निर्धार विलास शिंदे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

SLA vs INDA : भारत-श्रीलंका सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा रोमहर्षक...

0
दिल्ली । Delhi श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या चालू त्रिकोणीय मालिकेत आज क्रिकेटचा खरा थरार पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या...