Thursday, July 23, 2026
HomeनाशिकGokul Gite : विशेष विमानाने गिते सामंतांसोबत मुंबईला गेले अन् शिवसेनेचे सहयोगी...

Gokul Gite : विशेष विमानाने गिते सामंतांसोबत मुंबईला गेले अन् शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले; म्हणाले, “पक्ष संघटनेची…”

नाशिक | Nashik

नाशिक विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) शिवसेना (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी दणदणीत विजय मिळवला. दराडे यांना २४८ तर गिते यांना ३५८ मते मिळाली, त्यामुळे जवळपास १०० मतांनी ते निवडून आले. या विजयानंतर गिते यांना तातडीने मंत्री उदय सामंत यांनी संपर्क साधला. यानंतर त्यांना नाशिकहून विशेष विमानाने घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते.

- Advertisement -

मुंबईत पोहोचल्यानंतर गिते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे (Shirkant Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर गोकुळ गिते यांनी मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर ती सुद्धा पार पाडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ते म्हणाले की, “मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कामांनी पूर्वीपासून प्रभावित आहे. बंधू गणेश गिते हे स्थायी समिती सभापती असताना अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी गाठभेट झाली आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहून मी प्रभावित असून, माझी आधीपासून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या मतदारांची भविष्यात कामे करण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिवसेना पक्षाचा सहयोगी म्हणून काम करण्यास परवानगी दिलेली आहे, असे गिते यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी निडणूक पुढे नेली

यावेळी ते म्हणाले की, नाशिक विधान परिषदेची निवडणूक माझ्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे नेली. मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) मंत्री दादा भुसे आणि बाकीचे आमदार आले होते. मी त्यांना सांगितलं होतं की, माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. कारण त्यांना आपला भविष्यातील विजय दिसत होता. मी इच्छा व्यक्त केली की, मी निवडून आलो आहे. या मतदारसंघाच्या मतदारांनी मा‍झ्या बाजूने कौल दिला आहे, असे देखील गिते यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

पडसाद : रक्तपेढीला मिळाले अखेर उद्घाटनाचे टॉनिक!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये...