Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate : मला रमी खेळता येत नाही, राजीनामा देण्यासारखं काय घडलं...

Manikrao Kokate : मला रमी खेळता येत नाही, राजीनामा देण्यासारखं काय घडलं – कृषिमंत्री  कोकाटे

नाशिक | Nashik

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे गेल्या काही दिवसांपासून जंगली रमी व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात रमी जंगली खेळताना शेअर केला होता. त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यानंतर आज (मंगळवारी) माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तरपणे भाष्य केले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना कोकाटे म्हणाले की, “मला विधानसभेचे (Vidhansabha) सर्व नियम माहिती आहे. त्यामुळे विधानभवनात काय करावं हे मला कळतं. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा विषय येतोच कुठे. राजीनामा (Resignation) देण्यासाठी मी कुणाचा विनयभंग केला आहे का? माझ्या बदनामीमागे कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. या प्रकरणात सविस्तर चौकशी लावणार असून, जर आरोप सिद्ध झाले तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कोणालाही न भेटता एका सेकंदात मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “मी शेतकऱ्यांच्या (Farmer) भावना दुखावतील असं काही केलं नव्हतं. मुळात हा विषय छोटा आहे, तो का लांबवला जात आहे हे मला समजत नाही. मी आधीही खुलासा केला आहे. माझ्या या बदनामीमागे मीडियाचे (Media) काही लोक देखील असू शकतात. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांचे सीडीआर तपासणार आहे. तसेच ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. मोठा व्हिडीओ असेल तर त्यांनी दाखवावा. तसेच मुख्यमंत्र्यांना मी ब्रीफ केलेलं नाही, त्यांनी माध्यमांवर विश्वास ठेऊन माझ्या जंगली रमीच्या व्हिडीओवर (Video) प्रतिक्रिया दिली आहे”, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

तसेच “ऑनलाईन रमी (Online Rummy) काय प्रकार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ते खेळण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर, बँक अकाऊण्ट ऑनलाईन रमी खात्याशी जोडावं लागतं. माझ्या मोबाईलमध्ये (Mobile) गेमची जाहिरात लोड झाली. कारण नवीन मोबाईल होता, स्कीप कसा करायचा हे मला कळत नव्हतं”, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले.

ताज्या बातम्या