Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : नाशकात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीची हातमिळवणी! जागांचा तिढा...

Nashik Politics : नाशकात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीची हातमिळवणी! जागांचा तिढा मात्र कायम

भाजपचा २०१७ चा पॅटर्न आणि स्वबळाची तयारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असताना महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. भाजपच्या (BJP) मोठ्या भावाच्या भूमिकेला आव्हान देत आता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत १२२ जागांवर लढण्याची तयारी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र, याबाबत पदाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

महायुतीत जागांवरून तीव्र ओढाताण सुरू आहे. भाजपकडे ६५ विद्यमान नगरसेवक असल्याने ते ८० पेक्षा जास्त जागांवर अडून आहेत. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) ४५ जागांची मागणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३० जागांसाठी आग्रही आहे. मात्र भाजपने शिवसेना (Shivsena) ३५ आणि राष्ट्रवादीला अवघ्या सहा जागांचा प्रस्ताव दिला आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने संतापलेल्या शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतली.

YouTube video player

दरम्यान, या बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे, समीर भुजबळ, विजय करंजकर, अजय बोरस्ते, राजू लवटे, रंजन ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रभागात अडचणी आहेत, तेथे समन्वय साधून उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपकडून सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचा २०१७ चा पॅटर्न आणि स्वबळाची तयारी

स्थानिक पातळीवर चर्चा फिस्कटल्याचे पाहून भाजपने आता २०१७ प्रमाणे स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे. अन्य पक्षांतील दिग्गज नेत्यांसाठी भाजपने दारे उघडली असून, आयारामांच्या बळावर बहुमताचा आकडा गाठण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामुळे युतीतील मित्रपक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बंडखोर आणि मविआची फिल्डिंग

महायुती झाल्यास अनेक इच्छुकांचा पत्ता कट होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे मिळून १५०० हून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. ज्यांना उमेदवारी नाकारली जाईल, अशा तगड्या उमेदवारांना आपल्या गळाला लावण्यासाठी महाविकास आघाडीने आतापासूनच जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे.

भाजपची तडजोड करण्याची तयारी नसल्याने आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दोघांची प्राथमिक चर्चाही झाली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील.

दादा भुसे, शिवसेना

युतीबाबत सर्व पक्षांची प्रदेश स्तरावर बोलणी सुरू आहे. भाजप प्रदेश नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे युती किंवा स्वतंत्र भाजपचे बूथप्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी निवडणुकीस सामोरे जाऊ व १०० प्लसचा नारा पूर्णत्वास नेऊ.

सुनील केदार, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर जिल्हा

दृष्टिक्षेपात

  • अंतिम घटका : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त ४८ तास शिल्लक.
  • तिरंगी लढत ? : भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास नाशिकमध्ये तिरंगी लढत अटळ.
  • वरिष्ठ स्तरावर चर्चा : नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी हालचाली वेगवान.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...