Thursday, February 5, 2026
HomeराजकीयNashik Politics : "हो, मी पक्षात..."; ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजरांची कबुली,...

Nashik Politics : “हो, मी पक्षात…”; ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजरांची कबुली, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

मंत्री गिरीश महाजन यांनी काल माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे येत्या आठ दिवसांत कोण राहिलं हे कळेलं”, असे म्हटले होते. महाजन यांच्या बोलण्यातून ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी माध्यमांशी बोलतांना आपण पक्षात नाराज असल्याचे उघडपणे बोलून दाखवले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना बडगुजर म्हणाले की, “पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून अनेकजण नाराज आहेत.माझी नाराजी कोणावर नाही, मी स्वतःवरच नाराज आहे. याआधी मी स्वतःहून म्हटलं होते की, जिल्हाप्रमुख पदावरून मला बाजूला करा. मी काम करू इच्छित नाही. माझ्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मी मागणी केली होती. त्यानुसार माझी मागणी मान्य देखील झाली. पक्षासाठी एवढं काम केलं. आम्ही वातावरण बदलवून खासदार (MP) निवडून आणला. याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितले. अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली. पण अजून काही बदल दिसत नाही”, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player

पुढे बोलतांना बडगुजर म्हणाले की, “विलास शिंदेंची इच्छा होती की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा. पण तसे झाले नाही. त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. त्यावेळेस आम्ही त्यांची समजूत काढली. परंतु, पुढील काळात विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या कृतीतून आणि भावनेतून नाराजी निश्चितपणे दिसेल”, असेही त्यांनी सांगितले. तसेच माझ्या पक्षांतराच्या निर्णयाबद्दल अजून काही ठरलेले नाही”,असेही सुधाकर बडगुजर यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...