Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Politics : आमदार सुहास कांदे देणार छगन भुजबळांना धक्का; 'या' ...

Nashik Politics : आमदार सुहास कांदे देणार छगन भुजबळांना धक्का; ‘या’ बाजार समितीमधील सत्ता येणार संपुष्टात

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घडामोड घडून माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांचे कट्टर समर्थक असलेल्या १२ पैकी ६ संचालकांनी त्यांची साथ सोडत आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या गटात सामील झाले आहेत. या संचालकांनी सभापती दीपक गोगड यांच्या विरुद्ध उपजिल्हा निबंधकाकडे तक्रार अर्ज देत गोगड अल्पमतात आल्यामुळे त्यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शुक्रवार दि. ७ मार्च रोजी बाजार समितीची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत सभापती गोगड यांच्याविरुद्ध आमदार कांदे यांच्या गटातील संचालक अविश्वास ठराव आणण्याची दाट शक्यता आहे. ६ संचालकांनी साथ सोडल्यामुळे मनमाड बाजार समितीवर (Manmad Market Committee) असलेली भुजबळ गटाची सत्ता संपुष्टात येऊन आमदार कांदे समर्थकांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दीड वर्षा पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागासाठी निवडणूक झाली होती. त्यात १० जागावर भुजबळ समर्थक तर ४ जागावर आमदार कांदे समर्थक विजयी झाले होते. २ जागा व्यापारी गटाला मिळाल्या होत्या हे दोन्ही व्यापारी संचालक भुजबळ गटाला जाऊन मिळाल्यामुळे त्यांचे संख्याबळ १२ झाल्यामुळे भुजबळ समर्थकांनी बाजार समितीची सत्ता काबीज केली होती. मात्र त्यानंतर सर्व प्रथम संचालक असलेले माजी आमदार संजय पवार यांनी भुजबळ यांची साथ सोडली.

त्यानंतर आणखी ५ सदस्य आमदार कांदे गटात सहभागी झाले असून सध्या आमदार कांदे यांच्या समर्थकांची (Supporters) संख्या १० झाली आहे. यामध्ये संजय पवार, किशोर लहाने, कैलास भाबड, मधुकर उगले, अशोक डगळे, दशरथ लहिरे, आप्पा कुणगर, विठ्ठल आहेर, सुभाष उगले आणि संगीता कराड आदींचा समावेश आहे. भुजबळ गटाकडे आता ६ सदस्य उरले आहे. १८ सदस्य असलेल्या बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी १० सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या आमदार कांदे गटाकडे १० सदस्य असून व्यापारी गटातील २ सदस्य देखील या गटाला साथ देणार असल्याचे समजते.

त्यामुळे बाजार समितीतुन भुजबळ समर्थकांनी सत्ता संपुष्टात येऊन आमदार समर्थकांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांच्या कडून भुजबळ यांना हा तिसरा मोठा धक्का मानला जात आहे. या अगोदर विधानसभा निवडणुकीत २०१९ साली आमदार कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव करून भुजबळ यांना पहिला धक्का दिला होता. त्यानंतर आता नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) समीर भुजबळ यांचा पराभव करून दुसरा तर बाजार समितीत असलेली सत्ता देखील काबीज करून तिसरा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बाजार समितीतील सत्ताधारी गटातील ५ सदस्य आमच्या गटात आले आहे. यामुळे आमच्या गटाच्या संचालकांची संख्या १० झाली असून लवकरच बाजार समितीत सत्ता परिवर्तन होईल. बाजार समितीचा खरा मालक शेतकरी आहे मात्र त्याला पाहिजे त्या सुविधा मिळत नाही. सत्ता परिवर्तन होताच आम्ही शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहणार आहोत.

सुहास कांदे , आमदार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...