Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : 'ऑपरेशन लोटस'मुळे नाशकात भूकंप; बडगुजर, गिते, घोलप भाजपच्या गळाला

Nashik Politics : ‘ऑपरेशन लोटस’मुळे नाशकात भूकंप; बडगुजर, गिते, घोलप भाजपच्या गळाला

आणखी मोठे चेहरे तयारीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) सध्या जोरदार भूकंप घडत आहे. भाजपने (BJP) एकाचवेळी तीन बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावत नाशिकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ला वेग दिल्याचा प्रत्यय आला आहे. यामध्ये माजीमंत्री बबनराव घोलप, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, आणि पक्ष कारवाईमुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमधील सत्तासमीकरणे ढवळून निघणार आहेत.

- Advertisement -

आगामी मनपा निवडणुकांच्या (NMC Election) पार्श्वभूमीवर भाजपने मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधील आगामी मनपा, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही मोठी आणि आक्रमक खेळी ठरू शकते. शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्यासाठी ही गंभीर चिंतेची बाब आहे. नाशिकचे राजकारण पुढील काही दिवसांत आणखी धगधगत जाण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांपूर्वी उलथापालथीचे राजकीय समीकरणे समोर येऊ शकतात.

YouTube video player

दरम्यान, ‘ऑपरेशन लोटस’ची सूत्रे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सांभाळल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यांनी नाशिकच्या स्थानिक राजकारणात वजनदार भूमिका बजावत अनेक बड्या नेत्यांना भाजपत आणण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, एका माजी महापौरासह अशोक सातभाई व डझनभर माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही भाजपत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आज मुंबईत प्रवेश सोहळा

या सर्व नेत्यांचा प्रवेश सोहळा आज (दि.१७) दुपारी मुंबईत पार पडणार आहे. नाशिकमधून हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे नाशिक भाजपसाठी हा केवळ राजकीय नव्हे तर शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम ठरणार आहे. प्रत्यक्षात बडगुजर यांच्यापाठोपाठ बबनराव घोलप यांच्या प्रवेशाच्या वृत्तामुळे शिवसेना ठाकरे पक्षात अस्वस्थता पसरली आहे.

कामगार संघटना भाजप छत्राखाली?

नाशिक मनपातील म्युनिसिपल कामगार संघटना बबनराव घोलप यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. तिचे नेतृत्व सध्या सुधाकर बडगुजर करतात. आता ही संघटनाही भाजपच्या प्रभावाखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनातील आंतरिक समीकरणेदेखील मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.

हेमलता पाटील यांचे अर्थपूर्ण मौन

भाजप प्रवेश प्रक्रियेत माजी आमदार हेमलता पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, भाजपशी त्यांचा संवाद सुरू असल्याचे सूचक वृत्त आहे. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आमदारकी, महापौरकी, नेतृत्व सर्व काही दिले. तरीही एकनिष्ठता न ठेवता पक्षांतर करणे हे विचारांचे दारिद्र्य आहे. काही नेत्यांच्या जाण्यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही.

दत्ताजी गायकवाड, उपनेते शिवसेना (उबाठा)

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...