Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : अखेर बागुल, राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश; मात्र महाजनांनी दिली...

Nashik Politics : अखेर बागुल, राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश; मात्र महाजनांनी दिली तंबी, म्हणाले “पुन्हा कुठेही…”

नाशिक | Nashik

कोणीही वाद न घालता एकत्र काम करावे. यंदाच्या नाशिक महापालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) १२२ पैकी १०० चा आकडा पार करायचा आहे. नाशिकमधून रेकॉर्ड ब्रेक विजय (Won) करुन दाखवायचा आहे. सुनील बागुल यांचा आजचा हा शेवटचा प्रवेश आहे. त्यानी पुन्हा कुठेही जायचं नाही, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी बागुल यांना पुन्हा पक्षांतर न करण्याची तंबी दिली.

- Advertisement -

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा आज (रविवार) नाशिकमध्ये भाजपात (BJP) पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बागुल व राजवाडे यांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला. महाजन यांच्या हस्ते बागुल, राजवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचा गमछा गळ्यात घालुन कमळ हाती घेतले. पक्ष प्रवेशाच्या वेळी गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्यावर प्रखर टिका करणे टाळले.

YouTube video player

यावेळी महाजन म्हणाले की, “सुनील बागुल यांचा हा शेवटचा प्रवेश आहे. परत आता इकडे-तिकडे जाऊ नका. मागच्या वेळी सुधाकर बडगुजर आले, आता राजवाडे ही आले. आता देशातील प्रगती पाहून सर्वांनाच भाजपमध्ये यावे असं वाटत आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) नावाचे वादळ देशात नाही तर जगभर घोंघावत आहे. जगात कुठेही जा मोदी, इंडिया, भारत या नावाचीच चर्चा आहे. वाचाळवीर खूप आहेत. सकाळ पासून काही लोक सुरू होतात”, असे म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, “त्यांच्याकडे कोणी राहिले नाही. आता कोण महानगरप्रमुख गीते आहेत. त्यांना आपल्याला घ्यायचे नाही. आता, भाजप हाऊसफुल्ल झाले आहे. आता कोणाला घ्यायचे नाही, असे म्हणत महाजन यांनी माजी आमदार वंसत गीते (Vasant Gite) यांच्यावरही अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. यावेळी आ. सीमा हिरे, राहुल ढिकले, देवयांनी फरांदे, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, बाळासाहेब पाठक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...