Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Politics : बागुल, राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी हाती...

Nashik Politics : बागुल, राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी हाती घेणार ‘कमळ’

नाशिक | Nashik

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा भाजप (BJP) प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या रविवारी नाशिकमधे (Nashik) हे दोघेही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्तीप्रदर्शनासह पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बागुल आणि राजवाडे हे लवकरच भाजपवासी होणार आहेत.

- Advertisement -

महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मामा राजवाडे यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ता गजू घोडके (Gaju Ghodke) याला
एका फेसबुक व्हिडिओवरून (Facebook Video) कार्यकर्त्यांसह मारहाण केली होती. त्यानंतर बागुल आणि राजवाडे यांच्याविरुद्ध घोडके यांनी फिर्याद दिली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यानंतर दोघेही फरार झाले होते. त्यानंतर या दोघांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ते अज्ञातवासात असल्याने पोलिसांच्या दप्तरी या दोघांची नोंद ‘फरार’ अशी झाली होती. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबला होता.

YouTube video player

मात्र, त्यानंतर तक्रारदार गजू घोडके यांनी यांनी तक्रार मागे घेतल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला होता. घोडके याने भद्रकाली पोलिसांना (Bhadrakali Police) लेखी पत्र सादर करून प्राणघातक हल्ला व चोरी झालीच नसल्याची कबुली देत दागिने घरातच सापडल्याचे सांगून केवळ काही संशयितांनी दुखापत केल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांचा नाशिकमध्ये (Nashik) भाजपप्रवेश होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

घोडकेचा बोलविता धनी कोण?

घोडके याने पूर्वी दिलेला जबाब आणि फिर्याद सीसीटीएनएसला अपलोड झाली असून पोलिसांना एफआयआरनुसार दोषारोपपत्र दाखल करावे लागणार आहे. मात्र, आता घोडके याने पूर्वी दिलेली फिर्याद व आताची लेखी नोंद तपास पथक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे. त्यामुळे खोटी फिर्याद दाखल केल्याचे निष्पन्न झाले तर त्याच्यावर उलटपक्षी गुन्हा दाखल होऊ शकतो व शिक्षा लागू शकते. तर आता ही एफआयआर रद्द करायची किंवा कारवाई काय करायची, यासंदर्भातील आदेश न्यायालयच देणार आहे. त्यामुळे घोडकेच्या अडचणी वाढणार असून त्याला हा उपद्व्याप करण्यासाठी कोणाची ‘बॅकिंग’ होती? यामागचा बोलविता धनी कोण? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...