Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : सुनील बागुल आणि मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर! राऊतांच्या...

Nashik Politics : सुनील बागुल आणि मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर! राऊतांच्या ट्विटमुळे थांबल्याची चर्चा

नाशिक | Nashik

ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) आणि उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये (BJP) पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठाकरे गटाला (Shivsena UBT) मोठे खिंडार पडणार होते. मात्र, आता राजवाडे आणि बागुल यांचा पक्षप्रवेश तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी ‘मशाल’ सोडून धनुष्यबाण हातात घेतले. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. यानंतर लगेचच ठाकरे गटाकडून नाशिकच्या महानगप्रमुखपदी सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मामा राजवाडे यांची नियुक्ती केली. मात्र, महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी (Poliice) एका मारहाण प्रकरणात राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही नेते त्याठिकाणी उपस्थितही नव्हते, असे सांगितले जाते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र, हे दोघेही पोलिसांच्या (Police) हाती लागले नव्हते.

YouTube video player

त्यानंतर या दोघांनीही अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तोपर्यंत बागुल आणि राजवाडे अज्ञातवासात होते. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी या दोघांची फरार अशी नोंद झाली होती. त्यानंतर आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या जामीन अर्जावर ५ जुलैला सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून (Court) सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याबाबत काय निरीक्षण नोंदवले जाते, यावर भाजप नजर ठेवून आहे. त्यामुळे तोपर्यंत बागुल आणि राजवाडे या दोघानांही पक्षप्रवेशासाठी वेटिंगवर राहावे लागणार आहे.

आज सकाळी बागुल आणि राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत,” भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…क्लायमॅक्स असा की: हे सगळे फरार (भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!”, अशा शब्दात टीका केली होती.

दरम्यान, राऊत यांच्या याच टीकेची भाजपने धास्ती घेत बागुल आणि राजवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण या दोघांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला असता तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्न उभा राहिला असता. तसेच मतदार आणि समाजामध्ये भाजपबाबत चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे भाजप नेतृत्वाने सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला तूर्तास ब्रेक दिल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Kamaal R Khan : अभिनेता कमाल खानला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी;...

0
मुंबई | Mumbai अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता...