Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार? बड्या नेत्याने घेतली...

Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार? बड्या नेत्याने घेतली DCM शिंदेंची भेट

नाशिक | Nashik

शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख तथा ज्येष्ठ नेते विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या कन्येच्या नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी (दि. ८) नाशिकमध्ये शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यास जाताना दुगाव फाटा येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची विलास शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या बैठकीला दांडी मारणारे विलास शिंदे लवकरच शिंदे सेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून ओळख असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये उबाठा (Shivsena UBT) गटात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नाशिक दौऱ्यात उबाठा उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी उबाठा जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार बडगुजर यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली.

तर उबाठा गटाने दत्ता गायकवाड (Datta Gaikwad) यांना तत्काळ उपनेते पद दिले. त्यानंतर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत (Mumbai) मातोश्रीवर बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. या बैठकीस विलास शिंदे यांनी घरगुती कारणास्तव आपण बैठकीस येऊ शकणार नाही, असे जिल्हाप्रमुख, उपनेते यांना सांगितले होते.

मंत्र्यांची नाशिकमध्ये विवाहास हजेरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, शालेय शिक्षणमंत्री, दादा भुसे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकमध्ये विविध नेत्यांच्या मुला-मुलींच्या विवाहात उपस्थित राहून शुभआशीर्वाद दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी आमदार नरेंद्र दराडे, तसेच माजी नगरसेवक दीपक दातीर यांच्याकडील विवाहाला त्यांनी हजेरी लावली.

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ मे २०२६ – राजभवनाचा राजकीय अडथळा

0
तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर दक्षिण भारताच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून तामिळनाडूच्या...