Thursday, February 5, 2026
HomeराजकीयNashik Politics : मॅरेज डिप्लोमसीतून मायाजाल; ठाकरे सेनेच्या नेत्यांची महायुतीशी जवळीक?

Nashik Politics : मॅरेज डिप्लोमसीतून मायाजाल; ठाकरे सेनेच्या नेत्यांची महायुतीशी जवळीक?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पुतण्या व शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांची कन्या या दोन विवाह समारंभांच्या निमित्ताने शहरात राजकीय नेत्यांच्या मांदियाळीतून काल (सोमवारी) मॅरेज डिप्लोमसीचा प्रत्यय आला. पुतण्याच्या विवाहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून होते. सिंहस्थ बैठकीसह असंख्य कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांनी या दिवसांचा उपयोगही केला.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाच्या (Marriage) निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.पाठोपाठ ठाकरे गटाचे आणखी एक नेते सुधाकर बडगुजर यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विलास शिंदे व बडगुजर या दोघांचीही नावे गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराबाबत चर्चेत असल्याने या मॅरेज डिप्लोमसीला विशेष महत्त्व आले.

YouTube video player

एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारावर चालणारा विलास शिंदे हा कार्यकर्ता असल्याने मी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खास आल्याचे आवर्जून सांगितले. विलास शिंदे यांनीही हा आपल्या कुटुंबासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सांगून, माझ्या जन्माचे सार्थक झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.याच विवाहासाठी नाशिकमध्ये असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारणा केली असता विवाह सोहळ्याला कोणीही जाऊ शकते. विवाहसोहळा हा आनंदाचा क्षण आहे. त्याला राजकीय रंग देऊ नये असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मध्यंतरी भाकरी फिरवण्याच्या निमित्ताने जिल्हाभरात खांदेपालट केली होती. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना उपनेतेपदी बढती देत जिल्हाप्रमुख पदावर डी. जी. सूर्यवंशी यांची नेमणूक केली. प्रत्यक्षात विलास शिंदे यांची वर्णी लागण्याची अपेक्षा शिवसैनिकांमध्ये होती. मात्र विलास शिंदे यांना महानगरप्रमुख पदावरच ठेवत डीजी सूर्यवंशी यांना बढती दिल्याने शिंदे काहीसे नाराज होते.

यानंतर मध्यंतरी त्यांचे कार्यक्रमांना गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले होते. त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून संजय राऊत शुभेच्छा देऊन गेले. एकनाथ शिंदे यांनी मात्र खास हजेरी लावून विलास शिंदे यांना आपल्या गोटात (Group) ओढले, अशी चर्चा विवाह सोहळ्यात रंगली होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...