Thursday, June 11, 2026
HomeनाशिकNashik Politics : बडगुजर-शहाणे वाद पुन्हा उफळला; वादग्रस्त वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप

Nashik Politics : बडगुजर-शहाणे वाद पुन्हा उफळला; वादग्रस्त वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन कट्टर राजकीय विरोधकांमधील जुना वाद छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा उफाळून आला. महालक्ष्मी चौक (Mahalakshmi Chowk) येथे आयोजित सभेत नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

महालक्ष्मी मित्र मंडळ व छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुकेश शहाणे यांनी नाव न घेता सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका केली. “सलीम कुत्तासोबत नाचणारा कुत्ता आता भगव्याखाली आला असून उद्या हिंदूंचा घात करेल, “असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यावर सुधाकर बडगुजर यांनी थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे पुत्र दीपक बडगुजर (Deepak Badgujar) आणि समर्थक नगरसेवकांनी सोशल मीडियावरून (Social Media) शहाणे यांच्यावर जोरदार टीका केली. दीपक बडगुजर यांनी व्हिडिओ पोस्ट करत, एक मोकाट कुत्र भुंकून गेले. तो कुत्रा ज्या केसबद्दल बोलत होता त्यामध्ये कुठलेही पुरावे नसल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे.

ज्याचा मागील काळात कायद्याचा बालेकिल्ला झाला अशा लोकांनी आम्हाला हिंदत्व शिकवू नये. आम्ही कायद्याचा सन्मान करतो पण तरीही गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार अशी बेताल वक्तव्य करत असतील तर जशाच तशे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. नगरसेविका साधना मटाले (Sadhana Matale) यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संबंधित लोकप्रतिनिधीवर टीका केली. गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीने आपल्या वक्तव्यांवर नियंत्रण ठेवावे. सिडकोतील वातावरण खराब करण्याचे काम सुरू असून पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

परवानगी नसतानाही सभा आयोजित

महालक्ष्मी चौक येथे आयोजित सभेला अंबड पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. तरीही संबंधित मंडळांकडून कार्यक्रम घेण्यात आला.

काय आहे बडगुजर-शहाणे वाद ?

भाजपचे दीपक बडगुजर आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यातील वाद सोशल मीडियावरून सुरू झाला होता. पुढे महापालिका निवडणुकीदरम्यान शहाणे यांचे भाजप तिकीट कापण्यात आले. त्यानंतर शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक जिंकली. काही काळ शांत झालेला हा संघर्ष आता संभाजी महाराज जयंती कार्यक्रमामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबा संस्थान; सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेली बातमी पूर्णपणे खोटी, तथ्यहीन व दिशाभूल...