Thursday, April 23, 2026
HomeनाशिकNashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पुन्हा मोठा धक्का; 'हा' बडा नेता...

Nashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पुन्हा मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

गेल्या काही दिवसापासून माजी आमदार बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) बैठकीला अनुपस्थितीत राहत होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. परिणामी आता ते शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करून भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक अशोक सातभाई हे सुद्धा पुन्हा भारतीय जनता पक्ष प्रवेश करणार आहे.

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakr Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याबरोबर आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते बबनराव घोलप हे सुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. तसेच माजी नगरसेवक अशोक सातभाई (Ashok Satbhai) हे सुद्धा त्यांच्याबरोबर भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे.

बबनराव घोलप हे विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. परिणामी महापालिकेची निवडणूक होणार असल्याने याबाबत सुद्धा त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. त्यामुळे ते स्वतः व त्यांचे पुत्र योगेश घोलप हे सुद्धा गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते.

लोकसभा निवडणुकीवेळी बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका लागल्या असता या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना देण्यात आली. त्यामुळे घोलप यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला व त्यांचे पुत्र योगेश घोलप (Yogesh Gholap) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

मात्र, या निवडणुकीत योगेश घोलप यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता मात्र ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अशोक सातभाई हे सुद्धा पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहे. सातभाई सुरुवातीला शिवसेनेत नंतर मनसेत (MNS) त्यानंतर भारतीय जनता पक्ष, विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा त्यांनी राजकीय प्रवास केला. यानंतर आता पुन्हा ते भाजपात स्वगृही जात आहेत.

भविष्यात जनतेची कामे करायची आहे. परंतु, आपल्याला ठाकरे गटाने रिटायर करून ठेवले आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहोत.

बबनराव घोलप, माजी मंत्री

ताज्या बातम्या

Assembly Elections 2026 : पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी दुपारपर्यंत ६२.१८ टक्के...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi देशातील आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले...