Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Politics : नांदगाव नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध

Nashik Politics : नांदगाव नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Election) माघारीला एक दिवस शिल्लक असतानाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश कवडे यांनी माघार घेतली. तर नगरसेवकपदाच्या सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे एकूण तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा धक्का देत नगरपरिषद निवडणुकीत महत्त्वाची आघाडी घेतली आहे. नांदगाव नगरपरिषदेत शिवसेनेची ताकद वाढल्याने आगामी राजकारणात नवे समीकरण दिसू लागले आहे.

- Advertisement -

नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत (Nandgaon Nagar Parishad Election) शिंदेंच्या शिवसेनेचे (Shinde Shivsena) चार उमेदवार बिनविरोध (Unopposed) निवडून आले असून स्थानिक राजकारणात याची मोठी चर्चा रंगली आहे. नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत  प्रभाग ६ अ) किरण देवरे,  प्रभाग क्रमांक ६ ब) वंदना चंद्रशेखर कवडे,  प्रभाग २ अ) दिपक पांडव यांची आज (गुरुवारी) बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी प्रभाग ८ ब) मधून खान जुबेदाबी गफार याची बिनविरोध निवड झाली आहे.

YouTube video player

दरम्यान, नांदगाव नगरपरिषदेतील एकूण २० नगरसेवकपदे (Corporators) आणि एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असताना, चार  जागा बिनविरोध होणे शिवसेनेसाठी गेम चेंजिंग ठरणार आहे. नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी हा बिनविरोध विजय शिवसेनेला नवीन ऊर्जा देणारा ठरत असून, राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. उर्वरित नगरसेवकपदासाठी १६ जागांसाठी चुरस वाढली असून, नगराध्यक्षपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विजयाचा प्रभाव आगामी राजकीय रणनीतीवर होणार हे निश्चित आहे.

नगराध्यक्षपदासाठी माघार

१) राजेश रामराव कवडे

२) विक्रांत चंद्रशेखर कवडे 

नगरसेवक माघार

  • प्रभाग १ – ब कपिल रघुनाथ  तेलुरे  
  • प्रभाग २ – ब मंगेश भागीरथ  पगारे 
  • प्रभाग ४ – ब  प्रशांत राजकुमार संत 
  • प्रमाग ४ – ब  पवन तिल्लोचंद कासलीवाल 
  • प्रभाग ६ – अ माधुरी सागर हिरे 
  • प्रभाग ८ – अ विक्रांत चंद्रशेखर कवडे

ताज्या बातम्या

Ravindra Chavan : विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र...

0
लातूर । Latur लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर चढू लागला असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने जिल्ह्याच्या...