Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या...

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी महापौर आज (मंगळवारी) शिंदेच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) आणि शिवसेनेचे (एकत्रित असताना) माजी महापौर दशरथ पाटील (Dashrath Patil) हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रवेश करणार आहेत. मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे ते प्रभाग क्रमांक ५ ड मधून अपक्ष निवडणूक लढवत असून, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. यानंतर आज ते अधिकृत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमोर माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांचे आव्हान आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर

तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी देखील दीड वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने मुलासाठी उमेदवारीचा शब्द दिला होता. परंतु,ऐन मोक्याच्या क्षणी मनसेचे (MNS) प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दशरथ पाटील यांच्या मुलाचा पत्ता कट झाला. त्यानंतर भाजपने प्रभाग क्रमांक ९-ड मधून   दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी दिली. तर दशरथ पाटील यांनी मुलगा प्रेम पाटील याचा मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून घेत उमेदवारी खेचून आणली. दशरथ पाटील आणि दिनकर पाटील हे दोघे सख्खे भाऊ असून, या निवडणुकीत त्यांची दोन्ही मुले एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे ही निवडणुक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक मुर्तडक यांनी महापौर (Mayors) म्हणून २०१५-१६ साली सिंहस्थाच्या काळात कामकाज बघितले होते. तर दशरथ पाटील यांनी २००३-०४ साली नाशिक महापालिकेचे महापौरपद भूषविले होते. त्यानंतर आज हे दोघेही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून, पक्षप्रवेशासाठी ते मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासह काही पदाधिकारी देखील पक्षप्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी मंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेनेचे आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजते.

हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत बिग फाईट; ‘या’ प्रभागांमध्ये वातावरण टाईट

ताज्या बातम्या