Friday, October 2, 2026
HomeराजकीयVilas Shinde : अखेर 'शिंदे' गेले शिंदेंकडेच; गळ्यात घातला भगवा गमछा, शिवसेनेत...

Vilas Shinde : अखेर ‘शिंदे’ गेले शिंदेंकडेच; गळ्यात घातला भगवा गमछा, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यात (Thane) हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, विलास शिंदे यांच्यासोबत सहा ते सात माजी नगरसेवकांनी आणि २० सरपंच व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात केलेल्या ‘शिंदे’ शिंदेंकडे येणारच हे विधान अखेर खरे ठरले आहे.

- Advertisement -

विलास शिंदे यांनी माध्यमांद्वारे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदे हे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा नाशिकच्या राजकीय (Nashik Politics) वर्तुळात सुरु होत्या. मध्यंतरी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. त्यावेळी राऊत यांनी विलास शिंदे यांना दोन आठवड्यात याबाबत बैठक घेऊ, असे सांगितले होते. मात्र, पंधरा दिवस उलटून देखील बैठक झाली नाही. त्यानंतर अखेर विलास शिंदे यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, विलास शिंदे या पक्षप्रवेशासाठी आज सकाळीच नाशिकहून हजारो गाड्यांच्या ताफ्यासह ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास विलास शिंदे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश झाला. यावेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्यासह नाशिकचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या माजी नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

विलास शिंदे यांच्यासोबत माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, धीरज शेळके, निवृत्ती इंगोले अशा १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह परिसरातील २० ग्रामपंचायतींचे सरपंच व कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....