Thursday, September 10, 2026
HomeनाशिकNashik Potholes News : इंदिरानगरमध्ये १०० मीटर रस्त्यावर अचानक मोठा खड्डा; महापालिकेची...

Nashik Potholes News : इंदिरानगरमध्ये १०० मीटर रस्त्यावर अचानक मोठा खड्डा; महापालिकेची धावपळ

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) १०० मीटर रस्त्यावर प्रभाग क्रमांक ३० आणि ३१ मधील सुदर्शन लॉजच्या बाजूला अचानक मोठ्या स्वरूपाचा खड्डा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्ता खचल्याचे समजताच नाशिक महानगरपालिकेच्या नवीन नाशिक व पूर्व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरक्षेचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने तत्काळ बॅरिकेडिंग करून संबंधित मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच प्रभाग क्रमांक ६ मधील नऊच्या गणपती रस्त्यावर (Ganpati Road) अशाच प्रकारे रस्ता खचून डंपर उलटल्याची घटना घडली होती. या ताज्या घटनेमुळे आता इंदिरानगर परिसरातही नागरिकांकडून (Citizen) तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

दोन पाइपलाइन एकत्र येत असल्याने गोंधळ

महापालिकेच्या बांधकाम विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता या ठिकाणी पाण्याच्या दोन पाइपलाइन एकत्र येत असल्याचे निदर्शनास आले. यातील एक मोठी पाइपलाइन असून दुसरी कॉलनी भागातील आहे. हे काम अत्यंत जुने असल्याने रस्ता नेमका कशामुळे खचला, याचे स्पष्ट कारण सध्या सांगता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

नैसर्गिक नाले बुजवल्याने मोठ्या संकटाची शक्यता

इंदिरानगर परिसरातील पावसाळी पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाबाबत नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राणीनगर मार्गे सनफ्लॉवर वेडिंग परिसरातून सुदर्शन कॉलनी, वनवैभव कॉलनी, श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन तसेच स्वामी विवेकानंद शाळेजवळील नाल्यांकडे पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या वाहत असते. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारतींचे बांधकाम होत असताना हे नैसर्गिक नाले बुजवले गेले आहेत किंवा त्यांचे मार्ग अडवले गेले आहेत. यामुळे भविष्यात संपूर्ण परिसरात मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेज, पाणीपुरवठा, वीज, गॅस पाइपलाइन तसेच इतर विभागांची कामे वेगवेगळ्या पद्धतीने केली जातात. त्याचबरोबर पावसाचे नैसर्गिक नालेही अनेक ठिकाणी अस्तित्वात राहिलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात रस्ते खचणे, पाणी साचणे किंवा मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महापालिकेने आताच संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण करून कायमस्वरूपी नियोजन करणे गरजेचे आहे.

संदीप जगझाप (जिल्हाध्यक्ष, नागरिक समस्या निवारण समिती, नाशिक)

आम्ही घटनास्थळी पाहणी केली आहे. या ठिकाणी पाण्याच्या दोन पाइपलाइन एकत्र येत आहेत. एक मोठी तर दुसरी कॉलनी भागातील पाइपलाइन आहे. हे काम अतिशय जुने असल्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडला, हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ आवश्यक दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.”

गौतम हांडगे (अभियंता, बांधकाम विभाग, नवीन नाशिक)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून पुन्हा प्रादेशिक वादाची ठिगणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी आपली आक्रमक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली...