Friday, September 25, 2026
HomeनाशिकNashik Potholes News : "रील्स, फोटोशूट पुरे आता..."; काँग्रेस गटनेत्याचे महापौर, कुंभमेळा...

Nashik Potholes News : “रील्स, फोटोशूट पुरे आता…”; काँग्रेस गटनेत्याचे महापौर, कुंभमेळा मंत्र्यांना पत्र, नेमकं काय म्हटलंय?

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यामुळे दररोज होणारे अपघात यावर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसचे (Congress) गटनेते तथा प्रभाग १४ चे नगरसेवक सुफी जीन (Sufi Jene) यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘रील्स, फोटोशूट आणि प्रसिद्धी पुरे झाली आता नाशिककरांचे जीव वाचवा’, अशा खरमरीत शब्दांत त्यांनी महापौर हिमगौरी आडके आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना खुले पत्र लिहून नाशिककरांच्या वेदनांकडे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

विकासाच्या नावाखाली नाशिककरांचा जीव धोक्यात

सुफी जीन यांनी आपल्या पत्रात (Letter) प्रशासकीय कारभारावर जोरदार टीका केली आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेले खोदकाम, पावसामुळे साचलेल्या पाण्यात लपलेले धोकादायक खड्डे आणि रोजची वाहतूक कोंडी यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांची विकासकामे कागदावर दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

खड्ड्यांमुळे नागरिक रुग्णालयात; कुटूंबांवर आर्थिक बोजा

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे (Potholes) अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक नागरिकांना फ्रॅक्चर, मणक्याच्या गंभीर दुखापती आणि कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही अपघातांमध्ये नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत, तर अनेक कुटुंबांवर उपचारांचा मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे नाशिककरांना आता केवळ घोषणा, रील्स आणि सोशल मीडियावरील फोटोशूट नको आहेत. त्यांना सुरक्षित रस्ते, दर्जेदार कामे आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व हवे आहे. रस्त्यावर पडणारा प्रत्येक नागरिक हा अपघाताचा नव्हे, तर या निष्काळजी व्यवस्थेचा बळी आहे, असेही जीन यांनी म्हटले आहे.

पत्रातील प्रमुख मागण्या

दोषी ठेकेदारांवर कारवाई : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
गुन्हे दाखल करा : नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
सुरक्षित रस्ते : शहरातील धोकादायक खड्डे आणि रस्ते तातडीने मुजवून सुरक्षित करावेत.
पर्यायी मार्ग : कोणतेही खोदकाम सुरू करण्यापूर्वी नागरिकांसाठी योग्य पर्यायी रस्त्यांची सोय उपलब्ध करून द्यावी.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...