ओझे l विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) परतीच्या पावसाने शनिवारी सांयकाळ पासून जोर धरल्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून अनेक ठिकाणचे पुल रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुक बंद झाली आहे. या परतीच्या पावसामुळे (Rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. त्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेंड, पुणेगाव तसेच तीसगाव हे सर्व धरणे १०० टक्के भरल्यामुळे या धरणामधून हजारो क्युसेक पाणी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कादवा, कोलवण तसेच उनंदा नदी काठावरील गावानां प्रशासनाकडून सतर्कतेचा देण्यात आला आहे.
शनिवारी सांयकाळपासून दिंडोरीच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पडणा-या पावसामुळे करंजवण धरणाच्या जलसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे धरणातून कादवा नदी पात्रात १९९६० क्युसेक पाणी कादवा नदीत सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे ओझे करंजवण कादवा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद आहे. तर याच पूर पाण्यामुळे म्हेळूस्के ते लखमापूर पाण्याखाली गेल्यामुळे या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. त्याचप्रमाणे पुणेगाव धरणातून उनंदा नदीत ४ooo हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून ओझरखेड धरणाच्या साडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.
तालुक्यातील वाघाड, करंजवण, पुणेगाव, ओझरखेंड या सर्व धरणातील पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे पालखेंड धरणातून २९००० हजार क्युसेक पाणी कादवा नदीत सोडण्यात आले आहे. धरणामधील जमा होण्या पाण्याची आवक लक्षात घेता टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता दंडगव्हाण तसेच कार्यकारी अभियंता भागवत यांनी दिली.
दिंडोरी तालुक्यात शनिवारी सांयकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यानां पूर आला आहे. त्याचप्रमाणे धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे नदीकाठच्या गावानां सतर्क राहण्याचे आदेश दिंडोरी पेठचे विभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे व तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिले आहे.




