Monday, July 15, 2024
Homeनाशिकवरुणराजा मिस यु! नाशिककरांची आर्त हाक

वरुणराजा मिस यु! नाशिककरांची आर्त हाक

नाशिक | वैष्णवी नेहरकर Nashik

- Advertisement -

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा,

पैसा झाला खोटा,

पाऊस आला मोठा…

ही कविता लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. लहान मंडळी असो वा मोठी, पाऊस सगळ्यांनाच आवडतो. यंदा मात्र पावसाने दडी दिली असून मुसळधार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिककर सध्या वरूणराजाला मिस करत आहेत. (Nashikites missing rain) अनेकांना गोदावरी दुथडी भरून वाहताना बघायची आहे. तर कुणाला या पावसात ओले चिंब व्हायचे आहे….

दरवर्षी नाशिकला मुसळधार पाऊस (Heavy Rain In Nashik) होतो. यंदा मात्र अद्यापही प्रतीक्षा लागून राहिली आहे. २०१९ चा पूर सर्वांनाच आठवतो. अनेकांनी या पुराचे फोटो व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. गोदावरीच्या पुराने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. घरातला चिखल बाहेर उपसताना नाकेनऊ येणारी मंडळीदेखील आता पावसाची वाट पाहत आहेत. (Nashikites waiting for rain)

दरवर्षी पडलेल्या पावसात विशेष आकर्षण असते ते म्हणजे पर्यटनाचे. पावसात ट्रॅकिंगला जाणे तेथे जाऊन निसर्गाचा आस्वाद घेणे, तसेच पावसात उंच डोंगरावर जाऊन फोटोसेशन करणे. यंदा मात्र कोविडमुळे अनेक ठिकाणी पर्यटनाला बंदी आहे. कसारा घाटातून निसर्गाचे नयनरम्य दृश्य नागमोडी वळणे धुके यांची गोष्टच निराळी असते.

पावसाचे दिवस खूप छान असतात. लहानपणी कागदाच्या होड्या. तसेच पाऊस आला की गंगेच्या घाटावर जाणे असायचेच. आधीचा पाऊस वेळेवर यायचा आता पत्र दडी दिल्याने वाट बघावी लागत आहे. पावसाच्या खूप आठवणी आहेत, नाशिककरांना नेहमीच पावसाचे कुतूहल असते यंदाही अपेक्षा करूयात चांगला पाऊस नाशिकला पडेल.

निकिता गायकवाड

पावसाच्या दिवसात सगळ्यात जास्त तारांबळ उडायची. नाशिकचा धो धो पाऊस पडल्याने, आमचे कौलाचे घर गळायचे. ठिकठिकाणी घरातील सर्व भांडी ठेवावी लागत असत. घरात अगदी स्विमिंग पूल बनत असे, पाऊस थांबला की सर्व पाणी बाहेर काढायचे यातच दिवस जायचा. आता तसा पाऊस आलेला नाही; म्हणून या दिवसांना मिस करते आहे.

कुंदा मोथरकर

- Advertisment -

ताज्या बातम्या