Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

नाशिक | Nashik

सध्या पावसाचा (Rain) परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, जाता जाता देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे. अशातच आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशकातही (Nashik) विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्याची मतदारसंख्या ५० लाखांवर; मालेगावची विशेष गती

YouTube video player

शहरातील शालिमार, मेनरोड, सीबीएससह आदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची (Citizen) चांगलीच धावपळ झाली. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच-पाणी साचल्याचे दिसून आले. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी पावसापासून लपण्यासाठी दुकानांच्या (Shops) गाळ्यांचा आधार घेतल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील पावसाने नाशिक शहरात (Nashik City) हजेरी लावली होती. त्यामुळे वाहनधारकांना गाडी चालवतांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले होते. यानंतर आज पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली असून अजूनही पाऊस सुरूच आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...