Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRain News : डांग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक रस्ते बंद, झाडे उन्मळून...

Rain News : डांग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक रस्ते बंद, झाडे उन्मळून पडली

सापुतारा | वार्ताहर | Saputara

डांग जिल्ह्यात (Dang District) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून, या पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. तर वघई-सापुतारा मुख्य रस्त्यावरील बाज गावाजवळ रस्ता वाहून गेला आहे. तसेच वघई-आहवा मुख्य रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी शालिनी दुहान लक्ष ठेवून असून, प्रशासनाच्या संबंधित विभागांना मार्गदर्शन करत आहेत.

- Advertisement -

तसेच पावसाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) प्रत्येक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणाहून बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात, निसर्गप्रेमी पर्यटक डांग जिल्ह्यातील वनव्याप्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. येथील नद्या, नाले, धबधबे, टेकड्या, झाडे, वन्यजीव इत्यादींसह सेल्फी घेणारे किंवा फोटो काढणारे लोक कधीकधी नकळत स्वत:चे किंवा इतरांचे जीवन धोक्यात घालतात. मात्र, मुसळधार पावसामुळे आता जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना याठिकाणी बंदी घातली आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह पर्यटकांना (Tourist) आवाहन केले आहे की, सार्वजनिक रस्त्यावर किंवा पर्यटनस्थळांवर वाहने बेशिस्तपणे पार्क करू नये. धोकादायक पद्धतीने सेल्फी किंवा फोटो काढू नये. तसेच नद्या, नाले किंवा धबधब्यांमध्ये प्रवेश करू नका.तसेच पाऊस किंवा पुराने भरलेल्या रस्ते आणि पुलांवरून जाऊ नका. भूस्खलनामुळे बंद असलेल्या रस्त्यांचा वापर करू नका आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य आणि स्वयंसेवकांना सहकार्य करा”, असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...