Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची धांदल

Nashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची धांदल

नाशिक | Nashik

राज्यातील विविध भागांत मे महिन्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने (Rain) जूनमध्ये काहीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे नागरिकांना (Citizen) उकाड्याचा सामना करावा लागत होता. तर शेतकऱ्यांच्या (Farmer) पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे पावसाचे आगमन नाशिकसह राज्यात कधी होणार याकडे, शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागून होते. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने (Rain) हजेरी लावली होती. यानंतर शनिवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास हजेरी लावली होती. त्यानंतर आज (रविवारी) पावणे पाच वाजेच्या सुमारास शहरातील (City) विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

YouTube video player

नाशकात पावसाची सुमारे एक तास जोरदार बॅटिंग | Nashik | Rain | Nashik Rain | Nasik

दरम्यान, आज पावसाने शहरातील शालिमार, मुंबईनाका, मेनरोड आरटीओ ऑफिस, सातपूर, महात्मानगर, कॉलेजरोड यासह आदी भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसापासून लपण्यासाठी नागरिकांनी (Citizen) यावेळी दुकानाच्या (Shop) गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे पहायला मिळाले. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...