Saturday, October 3, 2026
HomeनाशिकNashik Rain News : नाशिककरांना दिलासा: प्रचंड उकाड्यानंतर पावसाची जोरदार हजेरी

Nashik Rain News : नाशिककरांना दिलासा: प्रचंड उकाड्यानंतर पावसाची जोरदार हजेरी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना (Nashik) अखेर मंगळवारी (दि.२) पावसाने काहीसा दिलासा दिला. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन शहराच्या विविध भागांत जोरदार वारे वाहत पावसाने (Rain) हजेरी लावली.

- Advertisement -

सिडको, गंगापूर रोड, सातपूर, जुने नाशिक, शालीमार, पंचवटी आदी भागात पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व या पहिल्याच पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लहान मुलांनी घेतला. सोसाट्याच्या वाऱ्यासह काही काळ आलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी एकच धावपळ उडाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले. अचानक आलेल्या या सरींनी उघडयावर विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची मात्र आपला माल सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत होते. अशा वातावरणात मंगळवारी दुपारनंतर अचानक आकाशात ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना (Citizen) दिलासा मिळाला आहे.

हवामानात (Weather) झालेल्या या बदलामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सोसाट्याचा वारा असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि झाडांखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या आगमनामुळे नाशिकचे जनजीवन सुखद झाले असून, वातावरणातील उष्म्यात मोठी घट झाली आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...