Sunday, October 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची धांदल

Nashik Rain News : नाशकात पावसाची दमदार हजेरी; नागरिकांची धांदल

नाशिक | Nashik

राज्यातील विविध भागांत मे महिन्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने (Rain) जूनमध्ये काहीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे नागरिकांना (Citizen) उकाड्याचा सामना करावा लागत होता. तर शेतकऱ्यांच्या (Farmer) पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे पावसाचे आगमन नाशिकसह राज्यात कधी होणार याकडे, शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागून होते. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने (Rain) हजेरी लावली होती. यानंतर शनिवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास हजेरी लावली होती. त्यानंतर आज (रविवारी) पावणे पाच वाजेच्या सुमारास शहरातील (City) विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

दरम्यान, आज पावसाने शहरातील शालिमार, मुंबईनाका, मेनरोड आरटीओ ऑफिस, सातपूर, महात्मानगर, कॉलेजरोड यासह आदी भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसापासून लपण्यासाठी नागरिकांनी (Citizen) यावेळी दुकानाच्या (Shop) गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे पहायला मिळाले. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.

ताज्या बातम्या

राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी-अदानी यांच्यावरील डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट; कारण काय?

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून हटवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामागे मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेली...