Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Rain News : मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर नाशकात पहिल्या पावसाची हजेरी; नागरिकांची...

Nashik Rain News : मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर नाशकात पहिल्या पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

नाशिक | Nashik

‘मान्सून’ची (Monsoon) महाराष्ट्रात (Maharashtra) एन्ट्री झाल्यानंतरचा पहिला पाऊस (Rain) आज सकाळी नाशकात (Nashik) झाला. अकराच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. यानंतर सर्वत्र पावसाचे वातावरण झाले होते. त्यानंतर सव्वा आकराच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

- Advertisement -

नाशिक, अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागात मान्सूनच्या वाटचालीस वातावरण अनुकूल तयार झाले आहे. बुधवार दि.२८ ते शनिवार दि.३१ मे दरम्यानच्या चार दिवसात खान्देश, नाशिक तसेच संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची (Rain) शक्यता वर्तवली हेाती त्याची प्रचीता आज आली.

YouTube video player

दरम्यान, या पावसाने नाशिकच्या आठवडे बाजारावर पाणी फिरल्याचे दिसून आले. दर बुधवारी गोदावरी काठी बाजार भरतो. त्यासाठी धान्य बाजारात विविध शेतकरी माल घेऊन येतात. मात्र आाजच्या पावसाने त्यांची मोठी तारांबळ उडाली.

ग्रामीण भागातही पावसाची जोरदार हजेरी

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, सिन्नर, निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, याठिकाणी देखील पावसाने आज जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तसेच लासलगाव बाजार पेठ व मार्केट कमिटी शॉपिंगमध्ये पाणी शिरले होते. तर नांदूर शिंगोटेसह परिसरामध्ये सुमारे एक तास जोराच्या पावसाने हजरी लावली.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...