Sunday, May 10, 2026
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात दिवसभर पावसाची रिपरिप; जनजीवन विस्कळीत

Nashik Rain News : नाशकात दिवसभर पावसाची रिपरिप; जनजीवन विस्कळीत

नाशिक | Nashik

आज दिवसभर नाशिकमध्ये (Nashik) पावसाने (Rain) मुक्काम ठोकला होता. त्यामुळे शहरात २०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच जोर एवढा होता की, रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. दिवसभर सुर्यदर्शनही झाले नाही. या पावसामुळे सतराव्या दिवशी गोदावरी (Godavari) दुथडी भरुन वाहत आहे.

- Advertisement -

आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. गंगापूर (Gangapur) दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गही वाढवण्यात आलेला होता. धरणाच्या (Dam) पांणलोट क्षेत्रामध्ये होणार्‍या सततच्या पावसामुळे धरणामधला विसर्ग हा वाढण्याची शक्यता आहे. सध्या गोदाकाठचे आजूबाजूचे रस्ते आणि छोटे पुल यांना पाणी लागले आहे. तर पाण्याचा विसर्ग जर वाढला तर हे सर्व पुल आणि आजूबाजूचे मंदिर ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

दूतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाण्याने स्पर्श केला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. तर धार्मिक विधी परंपरेप्रमाणे काठाच्या थोडे दुरच होते आहे. परंतु, जर पावसाचा जोर वाढला, तर धरणाच्या क्षेत्रामधला पाऊस वाढला आणि धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आलीच तर मात्र येथील धार्मिक विधी, व्यवसायंकांना इतरत्र हलवले जाऊ शकेल.

दरम्यान, आज दुपारी पाऊस भरुन आला होता, थोडा वेळ चांगलाच बरसला. त्यामुळे जनजीवनावर परीणाम झााला असून, बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. आज शनिवार असल्याने चाकरमाण्यांनी घरीच राहणे पसंत केले. तसेच पाऊस असाच सुरु राहिल्यास भाजीपाल्याची आवक कमी होऊ शकते.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आणखी एक भोंदूबाबा गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील...