नाशिक | Nashik
जिल्हा आणि परिसरात पुढील काही दिवस पाऊस (Rain) राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. आज (सोमवार दि. ७ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मंगळवार (दि. ८ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान पाऊस ओसरून हलक्या सरींची शक्यता आहे. ११ सप्टेंबर रोजी हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने या सर्व दिवसांसाठी पावसाची ‘वेरी लाईकली’ (Very Likely) म्हणजेच तीव्र शक्यता दर्शवली आहे. अचानक होणारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी (Citizen) आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
घाट माथ्यावर पावसाचा जोर राहणार
जिल्ह्यातील घाट परिसरात मात्र पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम, ८ सप्टेंबरला मध्यम स्वरूपाचा, ९ सप्टेंबरला हलका ते मध्यम, १० सप्टेंबर रोजी हलक्या सरी आणि ११ सप्टेंबरला पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.




