Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात अवकाळी पावसाची धार कायम; नागरिकांची तारांबळ

Nashik Rain News : नाशकात अवकाळी पावसाची धार कायम; नागरिकांची तारांबळ

नाशिक | Nashik 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) हजेरी लावत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडतांना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

अवकाळी पावसाने काल (रविवारी) दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिक शहरात (Nashik City) विजांच्या कडकडाटासह तुफान हजेरी लावली होती. यानंतर आज (सोमवारी) देखील अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

YouTube video player

दरम्यान, नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएस, सिडको, नाशिकरोड, सातपूर यासह विविध भागांत अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवर (Road) मोठ्या प्रमाणावर पाणी (Water) साचल्याचे दिसून आले.

अवकाळीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला (Nashik District) बसला आहे. अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील ६०० गावांमधील जवळजवळ १४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे परिणामी जवळपास ३ हजार ४५४ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, कांदा, भाजीपाला यासह फळभागांचा समावेश आहे. सध्या स्थानिक यंत्रणेकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...