Sunday, September 22, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी

Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत उघडीप दिली होती. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज (दि.२२) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा शहरात हजेरी लावल्याने नागरिकांची (Citizen) एकच धावपळ उडाली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना

शहरातील नाशिकरोड, मेनरोड, सीबीएससह आदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. नाशिकरोड परिसरात (Nashik Road Area) जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावंर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर नाशिक शहरातील विविध भागांत जागोजागी पाणी साचले होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सोने चोरी करुन बंगालला पळणारा ताब्यात

दुसरीकडे सोमवार (दि.२३) पासून मान्सून परतण्याच्या मार्गावर राहण्याची शक्यता आहे.तसेच २४ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या आवर्तनातील पावसाची सुरुवात प्रथमतः विदर्भात जोरदारपणे व त्यानंतर मराठवाड्यात मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, खान्देश व नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ हलक्या पावसाने होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, दि. २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसांत मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर दि.२६ ते २९ सप्टेंबर याकाळात नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी कळवले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या