त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
उद्या तिसरा श्रावणी सोमवार (Shravani Monday) असल्याने आज (रविवार) दुपारपासूनच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकमध्ये गर्दी (Crowd) वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. मात्र, तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येलाच त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त
आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस (Rain) झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. तसेच या पावसामुळे यंदा प्रथमच त्र्यंबकेश्वरमध्ये विजांचा आणि ढगांचा कडकडाट (lightning) झाला. तर आज सकाळपासूनच प्रदक्षिणा मार्गावर पावसाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली.
हे देखील वाचा : Nashik Rain News : खडक माळेगावला पावसाची हजेरी
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची वाढती गर्दी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच उद्या तिसरा श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकमध्ये आणखी भाविक दाखल झाले आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात झटपट दर्शनासाठी भाविक आपल्यापरीने फिल्डींग लावतांना दिसत आहेत. त्यामुळे याचा ताण तेथील सुरक्षारक्षक आणि यंत्रणेवर येतांना दिसत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा