Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Rain : येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट; कांदा पिकाचे नुकसान,...

Nashik Rain : येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट; कांदा पिकाचे नुकसान, बळीराजा धास्तावला 

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यात (Taluka) सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वारा आणि गारांसह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. अकस्मात झालेल्या या अवकाळी पावसाने कांद्यासह (Onion) इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. अवकाळीच्या फटक्याने बळीराजा (Farmer) धास्तावला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील पूर्व भागातील (Eastern Region) राजापूर, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे परिसरात रविवारी, (दि. १३) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अकस्मात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवघे पंधरा- वीस मिनिटे झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. सध्या उन्हळकांदा कढणीला आला असून काही ठिकाणी कांदा कढणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी काढलेला कांदा भिजला. तर काढणीला आलेल्या कांद्याच्या पातीत पाणी (Water) शिरल्याने या कांद्याचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage) होणार आहे.

दरम्यान, शनिवारी (दि. १२) सायंकाळी येवला शहरासह (Yola City) कोटमगाव, धामोडे, भाटगाव, अंदरसूल, धुळगाव, अंतरवेली, सावरगाव परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर  नांदूर, सुकी, बाभूळगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. येवला शहरातील नागड दरवाजा भागातील हिंदुस्तानी मशिदीच्या मिनारवर वीज कोसळल्याने मिनारच्या काही भागाचे नुकसान झाले. तर मातुलठाण येथेही शेळ्यांच्या शेडवर वीज पडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...