Saturday, June 13, 2026
HomeनाशिकNashik Deola Rain : देवळा तालुक्याला अवकाळीचा फटका; शेती पिकांचे अतोनात नुकसान

Nashik Deola Rain : देवळा तालुक्याला अवकाळीचा फटका; शेती पिकांचे अतोनात नुकसान

दहिवड | वार्ताहर | Dahiwad

देवळा तालुक्यात (Deola Taluka) ऐन दिवाळीत (Diwali) अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने कांदे, डाळिंब, भाजीपाला, मका व उन्हाळी कांद्याची रोपे पूर्ण खराब झाली आहेत.अद्यापही पाऊस उघडण्याची चिन्हे दिसत नाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

- Advertisement -

संपूर्ण वर्षभरात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव (Onion Market) वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्यांची साठवणूक केली होती. परंतु, बाजारभाव न वाढल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात कांदा खराब झाला असून,१ ते ८ रुपये किलो दराने विकावा लागला. यातून सावरत असतांनाच पावसाळी कांदा, काढणीला आलेला मका तसेच तीन ते साडेतीन हजार किलो दराने घेतलेले कांद्याचे बियाणे संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहेत.

जुन ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्याची नुकसानभरपाई पीक विमा कंपनीने तसेच शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही दिलेली नाही. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांकडे परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा पैसे नसून, यंदाची दिवाळी सुतक पडल्यासारखी गेली. या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी नवीन कांद्याचे बियाणे टाकले होते. मात्र, त्यावरही आता पावसाचा (Rain) तडाखा बसल्याने रोपे मर होत आहेत.तर अनेक शेतकऱ्यांची काढून ठेवलेली कणसे आणि काहींचे दाणे अगदी पाण्यात तरंगताना दिसत आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या (Local Body Election) नशेतून बाहेर येत या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे. तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळवून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : ‘बंटी-बबली’ वकिलासह टोळी जाळ्यात; इंदिरानगर पोलिसांची कामगिरी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बनावट राजपत्रात नावनोंदणी करून आधारकार्डमध्ये बदल करत बनावट व्यक्ती उभा करून भूखंडाची विक्री करणाऱ्या बंटी-बबली वकिलांसह आठ संशयितांच्या इंदिरानगर पोलिसांनी...