Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Rain Update : मनमाड, येवला, चांदवडसह निफाडकरांना दिलासा

Nashik Rain Update : मनमाड, येवला, चांदवडसह निफाडकरांना दिलासा

तिसगाव, वाघाड धरण तुडुंब

ओझे l विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या तीन ते चार दिवसापासून समाधानकारक पाऊस (Rain) पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे प्रथमताच नदी,नाले खळखळून प्रवाहीत होत आहे त्यामुळे तालुक्यातील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होऊन तिसगाव, वाघाड धरण पूर्णक्षमते भरल्यामुळे या दोन्हीही धरणाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. चालू वर्षी प्रथम तालुक्यातील वाघाड धरण १०० टक्के भरले असून सोडण्यांतून १०१५ क्युसेक्स पाणी कोलवण नदीत येत आहे. तर मागील वर्षी चिंताजनक परिस्थिती असलेले तिसगाव धरण १०० टक्के भरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

त्याप्रमाणे दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्येवरून वरूनराजा मनसोक्त बरसत असल्यामुळे मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून पुणेगाव मोठया प्रमाणात पाणी येत असल्यामुळे तसेच पुणेगाव धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरण ८६.३४ टक्के भरले असून धरणातून (Dams) उनंदा नदीत १५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.तर पुणेगाव कालव्यातून दरसवाडीसाठी ५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पुणेगाव धरणातून (Punegaon Dam) सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे व परिसरात पडणा-या पावसामुळे मृतपाणीसाठा असलेल्या ओझरखेंड धरणाच्या पाणी पातळीत कमालाची वाढ होऊन ओझरखेंड धरण ८०.५९ टक्के भरले असून पावसाची परिस्थिती दोन ते तीन दिवस आशी राहिल्यास ओझरखेंड धरण लवकर १०० टक्के होईल आशी माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : मद्यधुंद चालकाने उडवल्या तीन गाड्या; पोलिसांनी काही तासांत घेतले ताब्यात

तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या करंजवण धरणाचा (Karanjwan Dam) पाणीसाठा ८० टक्के पर्यंत पोहचल्यामुळे मनमाड, येवला तसेच निफाड तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. करंजवण धरण व पश्चिम परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरणात पाण्याची आवक चांगली असून हे धरण लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे कादवा, कोलवण तसेच दिंडोरीतून जाणारी देव नदीला पूर येत असल्यामुळे पालखेड धरण ८९.७७ टक्के भरले असून धरणातून कादवा नदी पात्रात ८४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला आहे.सतत पडणा-या पावसामुळे नदी, नाल्यानां पूर आल्यामुळे तसेच धरणाच्या पाणीपातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : PM Modi Speech : “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत नव्या कायद्यात…”; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

दिंडोरी तालुक्यातील धरणांचा आजचा पाणीसाठा

पालखेड धरण – ८९.७७ टक्के
करंजवण धरण – ७६.११ टक्के
वाघाड धरण-१०० टक्के
पुणेगाव धरण-८६. ३४ टक्के
तीसगाव धरण-१०० टक्के
ओझरखेड धरण-८०.५९ टक्के

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या