Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik News : गंगापूर धरणातून दुपारी तीन वाजता 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग

Nashik News : गंगापूर धरणातून दुपारी तीन वाजता ‘इतक्या’ क्युसेकने पाण्याचा विसर्ग

नाशिक | Nashik

मागील आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बरीचशी धरणे (Dam) तुडूंब भरली होती. यामध्ये नाशिक शहराला (Nashik City) पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा तब्बल ८० टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाची दमदार हजेरी; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

YouTube video player

या विसर्गामुळे गोदावरीला (Godavari) आलेल्या पुराच्या पाण्यात रामकुंड (Ramkund) परिसरातून एक २९ वर्षीय युवक (Youth) वाहून गेल्याची घटना घडली होती. तसेच या विसर्गामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदावरीला पूर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच सोमवारपासून पावसाने पुन्हा उघडीप घेतली आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पूर काहीसा कमी झाला आहे. पंरतु, गंगापूर धरणातून विसर्ग सुरुच ठेवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : इगतपुरीत भरदिवसा खून; भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाने भावाला संपवलं

अशातच आज दुपारी तीन वाजता गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग ४९० क्युसेकने वाढवून एकूण २ हजार १८ क्युसेक इतका करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे दारणा धरणातून (Darna Dam) आज (सोमवार) सकाळी ८ वाजता १ हजार ३९० क्युसेकने कमी करून एकूण २ हजार ००१ क्युसेकने सोडण्यात आले आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandur Madhyameshwar Dam) सकाळी ६ वाजता ६ हजार ३१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...