Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : मोबाईल चोरणाऱ्या दोघांना बेड्या; आठ मोबाईल हस्तगत

Nashik News : मोबाईल चोरणाऱ्या दोघांना बेड्या; आठ मोबाईल हस्तगत

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashiroad

मोबाईल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस नाशिकरोड परिसरात वाढलेले असतानाच नाशिकरोड पोलिसांनी (Nashikroad Police) मोबाईल (Mobile) चोरणाऱ्या दोघा संशयितांना शिताफीने अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून 90 हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल नाशिकरोड पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे…

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात बाजारातून गर्दीच्या ठिकाणाहून तसेच बस स्थानक परिसरातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात नाशिकरोड पोलिसात नागरिकांच्या तक्रारी सुद्धा वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.

बाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

शनिवार दि. ०५ रोजी येथील सामनगाव रोड परिसरात राहणारे रमाकांत पासवान यांच्या घराच्या खिडकीतून मोबाईल चोरीस गेला होता. या संदर्भात त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संशयित चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, हवालदार सुभाष घेगडमल यांना गुप्त माहिती मिळाली.

Monsoon Session : “राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला”; स्मृती इराणींचा गंभीर आरोप

गुप्त माहितीच्या आधारे संशयित चोरटे नाशिकरोड बस स्थानक परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, हवालदार सुभाष घेगडमल, गुन्हे शोध पथकाचे पथकाचे आफताब शेख, संदीप पवार, मनोहर कोळी, नाना पानसरे, कल्पेश जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, यशराज पोतन आदींनी बस स्थानक परिसरात शोध घेतला .

त्यांना दोन संशयित फिरताना आढळले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचे नावे रोणा उर्फ रोहन सुभाष जाधव (रा. गाडेकर मळा, देवळाली गाव, नाशिक रोड) व परवेज जतीफ पटेल (रा. जिया उद्दीन डेपो, मालधक्का रोड, नाशिक रोड) असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची मोठी हानी : मंत्री भुजबळ

त्याचप्रमाणे त्यांनी नाशिक रोड परिसरात ठिकठिकाणी आठ मोबाईल चोरल्याचे कबूल केले असून पोलिसांनी हे मोबाईल त्यांच्याकडून जप्त केले आहे. या मोबाईलची किंमत सुमारे 90 हजार रुपये इतकी आहे.

या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Tribal Day 2023 : विधानभवनात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन; नरहरी झिरवाळांच्या वेशभूषेची होतेय सर्वत्र चर्चा

- Advertisment -

ताज्या बातम्या